Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

रविवार, १४ जून, २०२६

*माजी सैनिक शिवाजी सावंत यांच्या प्रदीर्घ आंदोलनास यश* *तामलवाडी येथील औद्योगिक कर वसुलीसाठी धाराशिव जिल्हाधिकाऱ्यांचे तहसीलदार तुळजापूर यांना कारवाईचे आदेश*

 *मुख्यसंपादक*

*टाइम्स 45 न्यूज मराठी*

*मो:-9730867448*



तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी ग्रामपंचायत हद्दीमधील बहुचर्चित औद्योगिक वसाहतीचा थकीत कर वसुलीसाठी माजी सैनिक तथा आशा सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सावंत शिवाजी रामकृष्ण  यांनी कर वसुली करण्याकरिता मागील तीन वर्षापासून सतत ३५ ते ४० वेळा लेखी पाठपुरावा केला होता व ०९ वेळा विविध प्रकारची आंदोलन केली होती त्या कामास अखेर यश आले.  सविस्तर वृत्त असे की, तामलवाडी ग्रामपंचायत हद्दीमध्ये राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील नामांकित कंपन्यांना तीन वर्षापूर्वीपासून सतत पाठपुरावा करूनही कंपन्या ग्रामपंचायत तामलवाडी स औद्योगिक कर भरण्यास सतत टाळाटाळ करत होते त्यामुळे श्री सावंत यांनी प्रशासनाकडे कायदेशीर लढाई लढून ग्रामपंचायत अधिनियम १९५९-६० मधील कलम १२४ व १२९ तसेच ग्रामपंचायत लेखा संहिता २०११ मधील तरतुदीनुसार जप्तीद्वारे वसुलीची प्रक्रियेला राबविता येत असतानाही प्रशासन सतत टाळाटाळ करत होते व अखेर शेवट धाराशिव जिल्ह्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी तहसीलदार तुळजापूर यांना कर वसुलीसाठी प्रशासकीय कारवाई कायद्याप्रमाणे जप्ती करून करण्याचे आदेश केले आहेत त्यामुळे तामलवाडी परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे, त्याचबरोबर श्री सावंत हे भाजपाचे सक्रिय कार्यकर्ते असल्यामुळे त्यांनी तामलवाडी ग्रामपंचायत हद्दीतील करवसुली कामी त्यांना धाराशिव जिल्ह्याचे नेते तथा तुळजापूर विधानसभेचे आमदार राणा जगजीतसिंग, जिल्हा परिषद सदस्य निवृत्ती (दादा) माळी, विक्रमसिंह देशमुख सभापती पंचायत समिती तुळजापूर यांचे मोलाचे मार्गदर्शन, सूचना व गटविकास अधिकारी तुळजापूर व या विषयाशी संबंधित सर्व प्रशासनातील अधिकारी कर्मचारी चे सहकार्य मिळाल्याबद्दल आभार व्यक्त केले व तहसीलदार तुळजापूर यांनी थकीत कर असलेल्या कंपन्याकडून वसुलीची कारवाई करण्याकरता जप्ती करून विना विलंब तत्काळ कारवाई करून तामलवाडी ग्रामपंचायतला आर्थिक दृष्ट्या स्वयंपूर्ण बनवावे ही विनंती केली आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा