*करमाळा, तालुका --प्रतिनिधी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-9850686360*
_विधान परिषद सभापती प्रा. शिंदेंच्या पुढाकाराने अनोखा सोहळा_
महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती तसेच चोंडी गावचे रहिवासी प्राध्यापक राम शिंदे यांच्या विशेष प्रयत्नातून त्यांच्या मूळ गावी चोंडी येथे उद्या धोंडे जेवणाचा आगळावेगळा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे या निमित्ताने चोंडी येथील लेक जावई यांचा यथोचित सन्मान करण्यात येणार आहे
सध्या अधिक मास सुरू असून, यानिमित्त लेक-जावयाला घरी बोलावून त्यांचा सन्मान करण्याची प्रथा मराठी कुटुंबीयांमधून व त्यांच्यासाठी पुरणाचे धोंडे करण्याची परंपरा मराठी कुटुंबीयांमधून सुरू आहे. हीच परंपरा अडाळखा गावासाठी साजरी करण्याचा अनोखा सोहळा उद्या रविवारी (१४ जून) चोंडी (ता. जामखेड) येथे सकाळी ९ वाजता होणार आहे. विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्या पुढाकाराने हा सोहळा होणार आहे. यानिमित्ताने लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मगावी चोंडी गावातील लेक-जावयांचा सन्मान व त्यांच्यासाठी धोंडे जेवण सोहळा होणार असून, अशा पद्धतीने एखाद्या गावाना धोंडे जेवण सोहळा अहिल्यानगर जिल्ह्यात नव्हे तर राज्यात पहिल्यांदाच होत आहे.
या कार्यक्रमाची माहिती देताना सभापती प्रा. शिंदे यांनी सांगितले की, चोंडी नगरीतील लाडक्या लेक-जावयांचा धोंडे जेवण व सन्मान सोहळा हा केवळ एक कार्यक्रम नसून गावातील विविध कुटुंबांतील लेकी आणि जावई यांच्याप्रती असलेली कृतज्ञता, प्रेम, जिव्हाळा आणि सन्मान व्यक्त करणारा आपुलकी समृद्ध संस्कृतीचा आणि परंपरेचा एक अनोखा सोहळा असून आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची ३०१ व्या जयंती व अधिक मासानिमित्त चोंडी नगरीतील लेकी आणि जावयांचा धोंडे जेवण सन्मान सोहळा उद्या सकाळी ९ वाजल्यापासून दुपारी ३ वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. सकाळी ९ वाजता लेक जावयांचे चोंडी येथे आगमन झाल्यानंतर जावयांना फेटा बांधण्याचा कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर लेक-जावयांची स्वागत मिरवणूक काढली जाणार आहे. सकाळी १० वाजता अहिलेश्वर मंदिर येथे लेक-जावयांचे आगमन व दर्शन होणार आहे. तेथेच सर्वांचे एकत्रित स्नेहभोजन समूह छायाचित्रण केले जाणार आहे. त्यानंतर माणकोजीराव शिंदे स्मारकात मुख्य सोहळा होणार आहे. सुरुवातीला प्रतिमा पूजन व मंचावर समारंभ झाल्यावर मार्गदर्शन व मान्यवर होणार आहे. त्यानंतर दुपारी १२.३० वाजता धोंडे जेवण झाल्यावर लेक-जावयांचा सन्मान व भेट वस्तू वाटप होणार आहे.
चोंडी येथील आयोजित धोंडे कार्यक्रमाचा मात्र सर्व राज्यभरातून सदर कार्यक्रमाची चर्चा होत आहे या नमित्ताने जावई तसेच लेकीचा सन्मान होत असल्याने जावईबापू मात्र मोठ्या आनंदात असल्याचे पहावयास मिळत आहे




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा