Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

सोमवार, २२ जून, २०२६

इंदापूरात स्मार्ट मीटरची सक्ती नको, शक्ती केल्यास आंदोलन करण्याचा इंदापूर शहर नागरी संघर्ष समितीचा इशारा.

 इंदापूर, डॉ. संदेश शहा.

दिनांक २२ जून २६

टाईम्स 45 न्यूज मराठी सहसंपादक मो. ९९२२४१९१५९



इंदापूर शहरातील ग्राहकांच्या पूर्व परवानगी शिवाय महावितरण

मंडळाने स्मार्ट वीज मीटर बसवू नयेत अशी मागणी इंदापूर शहर नागरी संघर्ष समितीच्या

वतीने वीज वितरण मंडळाचे अधिकारी युवराज जाधव 

यांना कार्यालयात जाऊन करण्यात आली. यावेळी या मागणीचे निवेदन श्री. जाधव यांना नागरी संघर्ष समितीच्या वतीने कृष्णा ताटे, हमीद आतार, महादेव चव्हाण, विजया कोकाटे, फकीर पठाण यांच्या हस्ते देण्यात आले.

 यावेळी नागरी संघर्ष समितीचे संस्थापक कृष्णा ताटे म्हणाले, 

शहरात वीज महावितरण कंपनी  

ग्राहकांना कोणतीही पूर्वकल्पना न देता त्यांचे जुने सुस्थितीत

चालू असलेले वीज मीटर बदलून नवीन स्मार्ट बसवत आहे. या स्मार्ट मीटर संबंधी

नागरिकांच्या वीज बील वाढवून येत असल्याच्या अनेक तक्रारी आहेत. हे स्मार्ट मीटर बसवत

असताना वीज मंडळ ग्राहकांना विश्वासात 

न घेता स्मार्ट मीटर बसवत आहे. वीज कायदा २००३

नुसार ही बाब 

बेकायदेशीर असून ग्राहकाच्या मूलभूत हक्कावर त्यामुळे गदा येत आहे. ग्राहक संरक्षण कायदा २०१९

मध्ये तरतुदीनुसार पूर्वीचे मीटर सुस्थितीत व्यवस्थित असताना महावितरण ग्राहकाच्या परवानगीशिवाय अचानकपणे वीज मीटर बदलता येत नाहीत. या स्मार्ट मीटर मुळे ग्राहकांवरती

आर्थिक भुर्दंड येत असून यामध्ये अनेक त्रुटी आहेत. ज्या ग्राहकाने स्मार्ट वीज मीटर बसवला आहे त्याच्या वीज बिलामध्ये वाढ झाल्याची तक्रार आहे तसेच नेटवर्क रेंज नसताना रीडिंगमध्ये अनेक तक्रारी दिसून येत आहेत.स्मार्ट मीटर संबंधी ग्राहकांच्या

मनामध्ये अनेक प्रश्न असून रेडिओ फ्रिक्वेन्सी सिग्नल मुळे

काय परिणाम होणार, वीज वापराची माहिती संकलित केल्याने व्यक्तीची प्रायव्हसी

 धोक्यात येणार का? वीज दरावर याचा काय परिणाम होणार ? तसेच बिल भरले न गेल्यास हे वीज कनेक्शन तातडीने कट होते, मग ज्यादा बिल आल्यास त्याची

तक्रार कोणाकडे करावयाची ? सदरचे जादा आलेले वीज बिल भरल्याशिवाय लाईट सुरु होणार नाही. जुने मीटर बदलण्यामागे नेमके कोणते आर्थिक गणित आहे ? हे ग्राहकांना स्पष्ट सांगितले जात नाही परंतु ग्राहकाला कोणतीही माहिती न देता स्मार्ट मीटर बसवले जात आहेत कंपनी एक मेसेज पाठवते आहे व स्मार्ट मीटर बसवते आहे. यासंदर्भात अधिक चौकशी केली असता 


सदरचे स्मार्ट मीटर संपूर्ण देशात बसवले जात असून यासंबंधीचे कॉन्ट्रॅक्ट मोठ्या

उद्योगपतींना दिले गेल्याचे समजते.

ज्या ठिकाणी स्मार्ट मीटर बसवले आहेत परंत ग्राहकाला मान्य नाही, त्या ठिकाणी स्मार्ट मीटर काढून 

पूर्वीचे वीज मीटर बसवण्यात यावेत. सध्या जे जुने मीटर 

आहेत ते कायम ठेवून 

स्मार्ट मीटर बसवण्याची प्रक्रिया

तातडीने बंद करावी यासंबंधी महाराष्ट्र शासनाच्या व माननीय

मुख्यमंत्री यांच्या ज्या सूचना आहेत, त्याप्रमाणे कारवाई होताना दिसत नाही. तामिळनाडू सारख्या

राज्याने स्मार्ट मीटर ही

संकल्पना पूर्णपणे नाकारली आहे. 

महाराष्ट्र शासनाने देखील सदरची

संकल्पना पूर्णपणे नाकारून ग्राहकाच्या हक्काचे संरक्षण

करावे अशा प्रकारचे निवेदन महावितरणच्या अधिकाऱ्यांना 

देण्यात आले.

यावेळी संघर्ष समितीच्या 

वतीने हमीद आतार म्हणाले, जर वीज ग्राहकावर अन्याय होत 

राहिला व पूर्वपरवानगी शिवाय वीज मीटर बदलले गेले व 

स्मार्ट मीटर बसवले गेले तर इंदापूर शहर नागरी संघर्ष 

समिती तीव्र आंदोलन करेल असा इशारा त्यांनी दिला.

यावेळी संघर्ष समितीचे 

फैय्याज इनामदार,

हनुमंत बोंगाणे,चंद्रकांत देवकर, भारत बोराटे, हाजी सलीमभाई

 बागवान, सूर्यकांत

 गुंड, प्रदीप पवार,  गजानन पवार, रघुनाथ

 खरवडे, वसंत जाधव, तय्यब मोमीन यासह अनेक ग्राहक उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा