*करमाळा, तालुका --प्रतिनिधी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-9850686360*
मकाई सहकारी साखर कारखान्यास १४० कोटी रुपयांचे आर्थिक पॅकेज मिळूनही हा कारखाना बंद आहे यामुळे या १४० कोटी रुपयांचे केले काय याचा हिशोब तालुक्यातील जनतेसमोर बागल गटाने मांडावा अन्यथा आपण या १४० कोटींची आकडेवारी मांडणार असल्याचा सुचक इशारा आमदार नारायण आबा पाटील गटाचे प्रवक्ते सूनील तळेकर यांनी सांगितले.
सध्या करमाळा तालूक्यात आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचा विषय गाजत असतानाच आमदार नारायण आबा पाटील गटाने आपला रोख मकाई सहकारी साखर कारखान्याकडे वळवला आहे. याबाबत अधिक सविस्तक्ष बोलताना पाटील गटाचे प्रवक्ते सूनील तळेकर यांनी सांगितले की आदिनाथ कारखान्याचा कारभार पारदर्शकपणे नाही केल्यानेच आदिनाथ कारखान्यावर आज ही बिकट परिस्थिती ओढावली आहे. यास कारण म्हणजे बागलांनी सभासदांपासून सर्वकाही गोष्टी लपवून ठेवल्या होत्या. पण आता मकाई कारखान्याचे तसे होऊ देणार नाही. मकाई सहकारी साखर कारखान्यास १४० कोटी रुपये कशासाठी हवे होते याची आकडेवारीसह माहिती आपल्याकडे आहे. विशेष म्हणजे साखर आयुक्तांची यावर सही असलेले दस्तावेज आपल्याकडे प्राप्त झाले आहेत. यामुळे बागल गटाच्या नेत्या रश्मी बागल यांनी व चेअरमन दिनेश भांडवलकर यांनी पत्रकार परिषद घेऊन या १४० कोटी रुपयांचा खर्च मकाई कारखान्यासाठी संचालक मंडळाने कशाप्रकारे केला आहे हे तपशीलवार सांगावे. अन्यथा आपण १२ जून रोजी ही माहिती सार्वजनिक करणार आहोत. यामुळे मग परत एकदा जनतेसमोर बऱ्याच धक्कादायक गोष्टी येतील. साखर आयुक्तांनी दिलेले निर्देश व मकाईच्या मागणीनुसार मिळालेल्या १४० कोटी रुपयातील महत्वाचे मुद्दे याबद्दल आपण सर्वकाही जनतेसमोर मांडणार आहोत. आणि यानंतर मकाईचे सभासद आणि जनताच याप्रमाणे प्रत्यक्ष मकाईच्या कार्यस्थळावर काम झाले का ? कामगारांच्या खात्यात तेवढे पैसे वर्ग झाले का ? याबाबींची सत्यता पडताळून पाहिल. यामुळे मग मकाई कारखान्याचे चेअरमन दिनेश भांडवलकर यांनी आपल्या नेत्यांच्या उपस्थितीत सर्वकाही माहिती करमाळा तालुक्यातील जनतेसमोर मांडावी. अथवा या १४० कोटी रुपयांवर खुले डिबेट करण्यासाठी तयार रहावे. सत्य फार काळ झाकून राहणार नाही. तुम्ही माहिती देणार नसाल तर आम्ही या गोष्टी उजेडात आणु असा सुचक इशारा पाटील गटाचे प्रवक्ते सूनील तळेकर यांनी दिला आहे.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा