Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

गुरुवार, ११ जून, २०२६

*अकलूज येथेनविन बस स्थानका जवळ मिक्सर ( टँकर )च्या धडकेत मोटर सायकल स्वार ठार ... परिवारावर कोसळला दुःखाचा डोंगर*

 मुख्यसंपादक

*टाइम्स 45 न्यूज मराठी*

*मो:-9730867448*



अकलूज येथील बस स्थानकाच्या पाठीमागे,महावीर पथ कडे जाणाऱ्या रोडवर प्रवीण इलेक्ट्रॉनिक्स समोर दुपारी ३ वाजेच्या सुमारास एक भीषण अपघात घडला असून एका भरधाव भारत बेंझ मिक्सर वाहनाने (टँकर) मोटर सायकलला समोरून जोराची धडक दिली.या अपघातात ४२ वर्षीय तरुण प्लंबरचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला आहे.अपघाता नंतर कोणतीही मदत न करता मिक्सर चालक घटना स्थळावरून पसार झाला असून,अकलूज पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे



सचिन सुभाष काळे (वय ४२,रा. बागेचीवाडी,पद्मावतीनगर,ता.माळशिरस,जि.सोलापूर) असे या अपघातात मृत्यू झालेल्या दुर्दैवी तरुणाचे नाव आहे…

याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेले सविस्तर वृत्त असे क

मयत खबर दिनांक 10/06/2026भी विक्रम सुरेश काळे वय 36 वर्षे रा बागेचीवाडी ता. माळशिरस मो नं 9011707819 समक्ष पोलीस ठाणेस हजर रराहुन खबरी जबाब देतो की, मी  वरील ठिकाणी माझे कुटुंबासह राहणेस असुन  मी व्यवसाय करून माझे कुटुंबाधी उपजिवीका भागवितो. आमचे शेजारीच माझा चुलत भाऊ सचिन सुभाष काळे वय 42 वर्षे हा राहणेस असुन त्याचे कुटुंबामध्ये वडील सुभाष, आई अनुसया, पत्नी उषा, दोन मुले असे एकत्रात राहणेस असुन तो प्लंबरचे काम करून कुटुंबाची उपजिवीका भागवितो. आज दिनांक 10/06/2026 रोजी दुपारी 03.25 वा चे सुमारास मी  आमचे घरी असताना रियाज शेख रा बागेचीवाडी यांचा माझे मोबाईलवर फोन करून त्यांनी सांगितले, तुमचा चुलत भाऊ सचिन सुभाष काळे यांचा प्रविण इलेक्ट्रॉनिक्स समोर मिसाळ हॉस्पीटल चे जवळ अकलूज येथे अपघात झाला आहे. व त्यांना अकलाई हॉस्पीटल येथे घेवुन गेले आहेत असे सांगितलेने मी अकलाई हॉस्पीटलमध्ये आलो असता तेथील डॉक्टरानी सचिन सुभाष काळे वय 42 वर्षे हा दुपारी 03.20 वा उपचारापुर्वीच मयत झाल्याचे सांगितले, तरी दिनाक 10/06/2026 रोजी माझा चुलत भाऊ सचिन सुभाष काळे वय 42 रा बागेचीवाडी ता. माळशिरस याचा प्रविण इलेक्ट्रॉनिक्स समोर मिसाळ हॉस्पीटल चे जवळ अकलुज येथे अपघात झाल्याने त्यास उपचाराकरीता अकलाई हॉस्पीटल अकलुज येथे दाखल केले असता तो दुपारी 03.20 वा उपचारापुर्वीच मयत झाला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. माझा वरील संगणकावर टंकलिखित केलेला खबरी जबाब माझे सांगणेप्रमाणे बरोबर असुन तो मी वाचुन पाहुन त्यावर सही केली आहे. हा जबाब दिला.स.ता.म. समक्ष मपोहेकाँ/1863 अडगळे पोलीस ठाणे अंमलदार अकलुज पोलीस ठाणे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा