*अकलूज --प्रतिनिधी*
*केदार लोहकरे*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
श्री जयसिंह मोहिते-पाटील विद्यालय संग्रामनगर येथे रोटरी क्लब अकलूजच्या वतीने ‘रोटरी की पाठशाळा’ उपक्रमांतर्गत पी.पी. पटेल अँड कंपनी यांच्या सीएसआर निधीतून ई-लर्निंग डिजिटल क्लासरूमसाठी अत्याधुनिक टीव्ही संच भेट देण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक मल्हारी घुले होते. प्रमुख पाहुणे म्हणून रोटरी क्लब अकलूजचे अध्यक्ष केतन बोरावके, माजी अध्यक्ष बबनराव शेंडगे, सदस्य आशिष गांधी तसेच प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक गणेश करडे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी सहशिक्षक महेश शिंदे व संगीत विभागातील विद्यार्थ्यांनी स्वागतगीत सादर करून मान्यवरांचे स्वागत केले. प्रास्ताविकात प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक गणेश करडे यांनी डिजिटल शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करत या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना होणाऱ्या शैक्षणिक लाभांची माहिती दिली तसेच रोटरी क्लब अकलूजचे आभार मानले.
यावेळी रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष बबनराव शेंडगे यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी भविष्यातही अशा शैक्षणिक उपक्रमांना पाठबळ देण्याची ग्वाही दिली.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन विश्वनाथ हलकुडे यांनी केले.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक,शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा