Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

बुधवार, २४ जून, २०२६

पार्वती कन्या प्रशालेतील विद्यार्थ्यांनी घेतली व्यसनमुक्तीची शपथ

 *जळकोट(तुळजापूर)-प्रतिनिधी*

   *शकिल मुलाणी*

*टाइम्स 45 न्यूज मराठी*


जळकोट तालुका तुळजापूर येथील पार्वती कन्या  प्रशालेतील २०० विद्यार्थ्यांनी घेतली व्यसनमुक्तीची शपथ.नशामुक्त भारत अभियान, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग सहाय्यक उपायुक्त सामाजिक न्यायविभाग धाराशिव जिल्हा समाजकल्याण अधिकारी जिल्हा परिषद धाराशिव आणि नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य चे धाराशिव जिल्हा संघटक तथा राष्ट्रपिता महात्मा गांधी राज्यस्तरीय व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार प्राप्त श्री. मारुती बनसोडे यांनी आज पार्वती कन्या प्रशालेतील २०० विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आणि व्यसनमुक्तीची शपथ दिली. सध्या अमली पदार्थ सेवन विरोधी सप्ताह सुरु आहे त्यानिमित्त हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. लता सोमवंशी - कदम व सर्व शिक्षक उपस्थित होते यावेळी राहुल सोनवणे सामाजिक कार्यककर्ते हे ही उपस्थित होते.मारुती बनसोडे यांनी दारू, तंबाखू, गुटखा,सिगारेट, ड्रग्स या व्यसनामुळे युवापिढी चे प्रचंड नुकसान होत आहे याची जाणीव करुन दिली आणि आपण व्यसनापासून अलिप्त राहण्याचे आवाहन केले

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा