Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

बुधवार, २४ जून, २०२६

करमाळा मतदार संघातील रस्ते विकासासाठी तीन कोटी रुपये निधी मंजूर* - आमदार नारायण आबा पाटील

 *करमाळा, तालुका --प्रतिनिधी*

*टाइम्स 45 न्यूज मराठी* 

 *मो:-9850686360*




करमाळा तालुक्यातील नादुरुस्त असलेल्या रस्त्यांची अवस्था पाहता ग्रामीण भागातील विशेषतः लहान गावाशी निगडीत असलेल्या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी गट अ मधून तीन कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याचे आमदार नारायण आबा पाटील यांनी सांगितले. याबाबत अधिक सविस्तर माहिती देताना आमदार पाटील यांनी सांगितले की आपण पालकमंत्री जयकुमार गोरे यांचेकडे करमाळा तालुक्यातील नादुरुस्त रस्त्यांची समस्या मांडली असता त्यांनी सकारात्मकता दाखवत तीन कोटी रुपयांचा निधी जिल्हा परिषद माध्यमातून करमाळा तालुक्यातील रस्त्यांच्या कामासाठी देण्यात यावे असे आदेश जिल्हा परिषदेस दिले. आता यातून १) कुगाव ते चिखलठाण  ग्रामा १०६ सा.क्र ००/०० ते १/५०० मध्ये रस्ता दुरुस्ती करणे.

(रक्कम-२५ लाख) २) गोयेगाव-घाडगेवस्ती-पवारवस्ती ग्रामा ७२ सा.क्र ०/०० ते ४/०० मध्ये रस्ता दुरुस्ती करणे.

(रक्कम २५ लाख) ३) कोंढार-चिंचोली -कात्रज ते प्रजिमा १ इजिमा-१०९ सा.क्र ४/०० ते १०/०० मध्ये रस्ता दुरुस्ती करणे.(रक्कम २५ लाख) ४) कोंढेज ते लव्हे ग्रामा ५९ सा.क्र ०/०० ते ३/०० मध्ये रस्ता दुरुस्ती करणे.(रक्कम २५ लाख) ५) कोर्टी ते पोंधवडी ग्रामा ९७ सा.क्र ०/०० ते ४/०० मध्ये रस्ता दुरुस्ती करणे.

(रक्कम २५ लाख) ६) कुंभेज-चोरमलवस्ती ते ग्रामा ६० ग्रामा १५१ सा.क्र ०/०० ते ३/०० मध्ये रस्ता दुरुस्ती करणे. (रक्कम २५ लाख) ७) कंदर-दहिवली ते बंडू मानेवस्ती रस्ता ग्रामा-२४२ सा.क्र.०/०० ते ३/५०० मध्ये रस्ता दुरुस्ती करणे. (रक्कम २५ लाख) ८) कुगांव ते सय्यद वस्ती ग्राम २७४ सा.क्र ०/०० ते २/०० मध्ये रस्ता दुरुस्त करणे. (रक्कम २५ लक्ष) ९) बिटरगांव (श्री) ते रा.मा-५६ ग्रामा-३० सा.क्र ०/०० ते ५/०० मध्ये रस्ता दुरुस्ती करणे. (रक्कम २५ लाख) १०) गुटाळवस्ती-काळेवस्ती ते केम ग्रामा १८७ सा.क्र ०/०० ते २/०० मध्ये रस्ता दुरुस्ती करणे. (रक्कम २५ लाख) ११) वांगी नं.२ ते इजिमा-१२ ला मिळणारा ग्रामा-६१ सा.क्र ०/०० ते ५/०० मध्ये रस्ता दुरुस्ती करणे. (रक्कम २५ लाख) १२) निंभोरे ते भाळवणी (साखर कारखाना) ग्रामा-२७६ सा.क्र ०/०० ते ४/०० मध्ये रस्ता दुरुस्ती करणे. (रक्कम २५ लाख) अशा बारा रस्त्यांसाठी तीन कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून लवकरच ही कामे सुरू होतील असेही आमदार नारायण आबा पाटील यांनी सांगितले.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा