*मुख्यसंपादक*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-9730867448*
अकलूज - दि. १४ जून २०२६ रोजी मौजे तांदुळवाडी ता. माळशिरस जि. सोलापूर येथील सातारा - पंढरपूर रस्त्यावरील पिकअप वाहनसह श्री. रामकृष्ण बाळासाहेब कदम यांचे विहीरीत १४ लोक पडले होते. त्यातील ४ महिला व ४ लहान मुले यांचा पाण्यात बुडून याच ठिकाणी मृत्यू झाला व ६ लोकांना स्वतः चा जिव धोक्यात घालून प्राण वाचविले ते इरफान रूबाब मुजावर व इतर १३ तरूण यांनी विहीरीत उड्या मारून त्या युवकांनी लोकांना बाहेर काढले व वाचलेल्या लोकांना बाहेर काढून त्यांचे प्राण वाचविले.
त्या युवकांची नावे १) इरफान रूबाब मुजावर २) श्री. तानाजी शिवाजी कदम ३) श्री. हनुमंत जोतिराम रंदवे ४) श्री. संतोष सुभाष डोके ५) श्री. किरण संतोष दुधाट ६) श्री. धनाजी तानाजी कदम ७) श्री. तुकाराम किसन कर्णेवर ८) गणेश महादेव धायगुडे ९) दादासाहेब वैजिनाथ माने १०) श्री. स्वप्निल शहाजी कदम ११) श्री. सुजित बळी हेगडे १२) श्री. महादेव सतिष कदम १३) श्री. तानाजी सुखदेव सुर्वे व १४) श्री. आप्पासाहेब तात्यासाहेब कदम सर्व रा. तांदुळवाडी ता. माळशिरस या सर्वांचा त्यांनी दाखविलेल्या शैर्याबाबत मराठा सेवा संघ व जिजाऊ ब्रिगेड यांचेवतीने दि.२८/०६/२०२६ रोजी तांदुळवाडी ग्रामपंचायत येथे सत्कार करण्यात आला.
सर्व प्रथमता राष्ट्रामाता राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूज
१) श्री. इरफान रूबाब मुजावर
२) श्री. किरण संतोष दुधाट
३) श्री. दादासो वैजीनाथ माने
४) श्री. स्वप्निल शहाजी कदम
५) श्री. तानाजी सुखदेव सुर्वे
६) श्री. आप्पासो तात्यासो कदम व
जिवंत वाचलेल्या लोकांनावर उपचार करणारे डॉक्टर राहूल मिले यांच्या हस्ते पुजन करण्यात आले. तदनंतर उपस्थित युवक मराठा सेवा संघाचे पदाधिकारी, जिजाऊ ब्रिगेडच्या पदाधिकारी व उपस्थित तांदुळवाडी ग्रामस्थ यांनी सामुदायिक जिजाऊ वंदनेचे गायन केले. प्रास्ताविक डॉ. राहूल मिले यांनी केले. श्री. इरफान रूबाब मुजावर यांनी घडलेल्या घटनेबाबत सविस्तरपणे माहिती त्यावेळेस दिली. त्यानंतर उपस्थित सर्व युवकांचा पुस्तके, शाल, फेटा व बुके देऊन सन्मान करण्यात आला. त्यात प्रामुख्याने इंजि. उत्तमराव माने, अक्काताई माने, मनोरमा लावंड, शारदा चव्हाण, राधिका शिंदे, मंगल मिले, गाथा मिले, श्रेया मिले, श्रध्दा मिले, शिवाजीराव लोंढे, बाळासाहेब पवार व दत्तात्रय लावंड यांनी सर्व युवकांचा सत्कार केला. शासन सदर विहिरीला संरक्षण करणेबाबत अजुनही गाफील आहे. सदर विहीरीच्या बाजूने पुर्ण लांबीत संरक्षण भिंत बांधून त्याशेजारी अजून असणाऱ्या विहीरीच्या ठिकाणी देखील संरक्षक भिंत बांधणे गरजेचे आहे. बैल गेला आणि झोपा केला अशी म्हण असून त्या म्हणी प्रमाणे शासनाचे काम आहे. यापुर्वीच संबंधीत खाते व ठेकेदार यांनी काळजी घेतली असती तर सदर लोकांचे प्राण वाचले असते अशी भावना प्राण वाचविलेल्या युवकांनी त्यांच्या मनोगतात व्यक्त केली.
. इंजि. उत्तमराव माने यांनी मनोगत व्यक्त करताना यासर्वांच्या भावना शासन दरबारी पोहच करण्याचे आश्वासन दिले व त्यांच्या शैर्याबद्दल कौतुक केले. सर्व युवकांचा उपस्थित सेवा संघ, जिजाऊ ब्रिगेड व ग्रामस्थांनी सत्कार केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुवर्णा घोरपडे यांनी केले. आभार नामदेव मिले यांनी मांडले. त्यानंतर ज्याठिकाणी घटना घडली त्याठिकाणची पाहणी मराठा सेवा संघ व जिजाऊ ब्रिगेड पदाधिकारी यांनी केली. कार्यक्रम यशस्वी करण्या करीता रहीम मुलाणी व नामदेव मिले, डॉ. मिले यांनी परिश्रम घेतले. सदर प्रसंगी समाधान चव्हाण, धनाजी कदम, अज्ञान लोखंडे, रूबाब मुजावर, बबन मिले, मंगल मिले, श्रध्दा मिले व तांदुळवाडीतील ग्रामस्थ उपस्थित होते.








कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा