*अकलूज --प्रतिनिधी*
*केदार लोहकरे*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
ग्रीन फिंगर्स आयुर्वेदिक कॉलेज व हॉस्पिटल शंकरनगर-अकलूज तसेच नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन (निमा) अकलूज शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने २१ जून रोजी जागतिक योग दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेले योग साधना शिबिर उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले.
या शिबिरासाठी योगतज्ज्ञ प्रा.धनंजय देशमुख (एम.ए.योगशास्त्र) यांनी विशेष मार्गदर्शन केले.उपस्थितांना विविध योगासने,प्राणायाम,कपालभाती आदींचे प्रात्यक्षिकांसह प्रशिक्षण देण्यात आले.यावेळी योग शिक्षिका सौ. वैशाली साळुंखे यांनी त्यांना मोलाचे सहकार्य केले.ग्रीन फिंगर्स स्कूलच्या ओपन ऑडिटोरियममध्ये पहाटेच्या प्रसन्न वातावरणात आणि निसर्गाच्या सानिध्यात आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरास मोठा प्रतिसाद लाभला.उपस्थितांनी उत्साहाने सहभाग नोंदवत योगाभ्यासाचा लाभ घेतला.
या कार्यक्रमास डॉ.उत्तम खरात,डॉ.सुधीर पोफळे (सेंट्रल निमा सदस्य),डॉ.अमोल माने (अध्यक्ष,निमा अकलूज),डॉ.प्रशांत निंबाळकर (अधिष्ठाता,ग्रीन फिंगर्स आयुर्वेदिक कॉलेज व हॉस्पिटल), डॉ.हरिश्चंद्र सावंत-पाटील,डॉ.संदेश गुळुमकर,डॉ.वल्लभ कुलकर्णी,डॉ. निलंबरी मगर,डॉ.तहमीम देशमुख तसेच महाविद्यालयातील विद्यार्थी, हॉस्पिटल कर्मचारी व योगप्रेमी नागरिकांनी या योग शिबीराचा लाभ घेतला.
या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक सत्यजित खताळ (एम.ए.संस्कृत) यांनी केले.शेवटी आभार प्रदर्शनानंतर शिबिराची यशस्वी सांगता करण्यात आली.
*चौकट*
"योग हा निरोगी जीवनाचा पाया असून शारीरिक,मानसिक आणि आध्यात्मिक आरोग्यासाठी योगाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे," असा संदेश या शिबिरातून देण्यात आला.






कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा