Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

सोमवार, २२ जून, २०२६

*केम ग्रामस्थांना दिलेला शब्द पाळला, कंदर-केम-रोपळे-कन्हेरगाव या २५ किमी रस्त्यासाठी २०० कोटी मंजूर------,आमदार नारायण आबा पाटील*

 *करमाळा, तालुका --प्रतिनिधी*

*टाइम्स 45 न्यूज मराठी* 

 *मो:-9850686360*

करमाळा तालुक्यातील केम ग्रामस्थांना दिलेला शब्द आपण पाळला असून नागरिकांनी मागणी केलेल्या रोपळे-केम-कंदर-कन्हेरगांव रस्ता प्रजिमा-१२ कि.मी (०/०० ते २५/००) या  २५ किलोमीटर अंतर असलेल्या रस्त्यासाठी तब्बल २०० कोटी रुपये मंजूर झाले असून येत्या काही दिवसांत या रस्त्याचे काम सुरू होणार असल्याची माहिती आमदार नारायण आबा पाटील यांनी दिली आहे. याबाबत अधिक सविस्तर बोलताना आमदार पाटील यांनी सांगितले की आपण आमदार पदाची जबाबदारी स्विकारल्यानंतर करमाळा मतदार संघातील दळणवळण सुविधा अधिक बळकट करण्यासाठी प्रयत्न चालू केले होते. मध्यंतरी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुक प्रचारा दरम्यान केम जिल्हा परिषद गटातील नागरिकांनी आपणाकडे रोपळे-केम-कंदर-कन्हेरगांव रस्ता प्रजिमा-१२ कि.मी ०/०० ते २५/०० या रस्त्यासाठीची मागणी केली. हा रस्ता अतिशय खराब झाल्याने या भागातील नागरिकांना गेली पाच वर्षे मरण यातना सहन कराव्या लागत होत्या. यामुळे विद्यार्थी, जेष्ठ नागरिक, रुग्ण, शेतकरी, महिला, नोकरदार, व्यावसायिक अगदी सर्वांची प्रवासाची गैरसोय झाली होती. यामुळे माझ्यासाठी या रस्त्याचे काम लवकरात लवकर करणे महत्वाचे होते. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि ग्रामविकास मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांचेकडे मी या रस्त्याच्या निधीसाठी मागणी करत राहीलो. सतत पाठपुरावा केला आणि एडीबी योजनेतून या रस्त्याच्या कामासाठी २०० कोटी रुपये निधी मंजूर करुन घेण्यात आपणास यश आले आहे. ADB (Asian Development Bank) योजनांतर्गत महाराष्ट्रात राज्य रस्ते आणि ग्रामीण रस्त्यांचा विकास आणि बळकटीकरण केले जाते. या प्रकल्पांचा मुख्य उद्देश ग्रामीण भागातील रस्ते मुख्य महामार्गांना जोडणे आणि शाश्वत, हवामानानुसार टिकणारे रस्ते बांधणे हा आहे. या योजनेतुन आता केम व माढा तालुक्यातील जनतेसाठी महत्वाचा असा २५ किलोमीटर अंतराचा रस्ता भक्कमपणे तयार केला जाणार आहे. लवकरच निविदा प्रक्रिया पुर्ण होऊन या रस्त्याच्या कामास सुरुवात होईल असे आमदार नारायण आबा पाटील यांनी सांगितले. आमदार नारायण आबा पाटील यांनी केम जिल्हा परिषद गटातील नागरिकांना निवडणूक काळात दिलेला शब्द पाळला व खरा करुन दाखवल्याने करमाळा मतदार संघातील नागरिकांकडून आमदार नारायण आबा पाटील यांच्या कार्यपद्धतीवर समाधान व्यक्त केले जात आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा