Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

सोमवार, २२ जून, २०२६

*वेळप्रसंगी जेल भरो आंदोलन करू मात्र आमच्या हक्काचे पाणी आम्ही इतर तालुक्याला देणार नाही..... मांगी सह इतर 22 गावातील ग्रामस्थांचा रास्ता रोको मध्ये इशारा----*

 *करमाळा, तालुका --प्रतिनिधी*

*टाइम्स 45 न्यूज मराठी* 

 *मो:-9850686360*


मांगी तलवामधील पाणी हळगाव तालुका जामखेड येथील कृषी महाविद्यालयाला देण्यासाठी आमचा विरोध असून यासाठी आज मांगीसहित 22 गावातील ग्रामस्थ तसेच सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी अहिल्यानगर ते सोलापूर या राष्ट्रीय महामार्गावर मांगी बस स्टॉप समोर आज दिनांक 22 जून रोजी सकाळी 11 वाजता रास्ता रोको आंदोलन केले होते या आंदोलनाला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला 

 करमाळा तालुक्यातील मांगी तलावा मधील पाणी हे आमच्या हक्काचे पाणी असून आम्ही जामखेड तालुक्यातील हळगाव येथील कृषी महाविद्यालयाला कदापिही पाणी देणार नाही यासाठी वेळ पडली तरी जेल भरो आंदोलन करू असा इशारा आंदोलनकर्त्यांनी आज राष्ट्रीय महामार्गावर मांगी या ठिकाणी बोलताना दिला


जामखेड तालुक्यातील हळगाव येथे सध्या कृषी महाविद्यालय असून या महाविद्यालयासाठी करमाळा तालुक्यातील मांगी येथील तलाव प्रकल्पामधून पाणी नेण्यासाठी शासकीय स्तरावर जोरदार प्रयत्न होत असून याला कडवा विरोध म्हणून आज आईला नगर ते सोलापूर या राष्ट्रीय महामार्गावर मांगीसहित 22 ग्रामस्थ तसेच सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी रास्ता रोको करीत आपला संताप व्यक्त केला यावेळी अहिल्यानगर ते सोलापूर हा राष्ट्रीय महामार्ग काही तास आंदोलनकर्त्यांनी रोखून धरला शेवटी आंदोलनकर्त्यांनी करमाळा तहसील कार्यालयातील निवासी नायब तहसीलदार जाधव साहेब यांना निवेदनाच्या प्रती देऊन रास्ता रोको चा समारोप करण्यात आला यावेळी मांगी गावासहित विविध पक्षातील कार्यकर्ते पदाधिकारी 22 गावांमधील असंख्य ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होती

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा