Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शनिवार, १३ जून, २०२६

खोट्या वैद्यकीय प्रमाणपत्रावरुन डॉ. दादासाहेब माने यांचे यशश्री हॉस्पिटल गोत्यात ?

 *करमाळा, तालुका --प्रतिनिधी*

*टाइम्स 45 न्यूज मराठी* 

 *मो:-9850686360*


आरोपींना गंभीर गुन्ह्यातून वाचविण्यासाठी खोट्या वैद्यकीय कारणावरून रुग्णालयात दाखल करुन गंभीर दुखापतीचे खोटे वैद्यकीय प्रमाणपत्र दिलेल्या    डॉ. दादासाहेब माने यांच्या यशश्री मल्टिस्पेशालीटी हॉस्पिटल, कंदर यांच्या गंभीर व्यावसायिक गैरवर्तनाबद्दल कडक कारवाई करुन मान्यता रद्द करण्याची मागणी   प्रा. डॉ. भारत बिचितकर यांनी महाराष्ट्र मेडीकल कौन्सिल आणि जिल्हा शल्य चिकित्सक यांचेकडे केली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, डॉ दादासाहेब माने यांचे मालकीचे कंदर येथे यशश्री मल्टिस्पेशालीटी हॉस्पिटल आहे. सदर रुग्णालयाने वैद्यकीय व्यवसायाच्या नैतिकता नियमांचे उल्लंघन करून गंभीर गुन्ह्यातील आरोपी श्री शंकर रामचंद्र तळेकर यास खोट्या वैद्यकीय कारणांवरून रुग्णालयात दाखल करून त्याला गंभीर दुखापत झाल्याचे खोटे वैद्यकीय प्रमाणपत्र दिल्याचा गंभीर प्रकार केला असल्याचा आरोप प्रा. भारत बिचितकर यांनी केला आहे.

आरोपी श्री शंकर तळेकर हा दि. 27.04.2026 रोजी प्रा. बिचितकर यांच्यावर झालेल्या खुनी हल्ल्यातील एक प्रमुख आरोपी आहे. 

करमाळा पोलीस स्टेशनमध्ये याबाबत गुन्हा दाखल झालेला आहे. सदर हल्ल्याच्या वेळी झालेल्या भांडणात या आरोपीस कोणतीही मारहाण अथवा दुखापत झालेली नाही. मात्र, सदर डॉक्टर हे आरोपीचे हितसंबंधीत असल्यामुळे त्यांनी वरील आरोपीस वैद्यकीयदृष्ट्या आवश्यकता नसतानाही त्यांच्या हॉस्पिटलमधे उपचारासाठी दाखल करून घेतल्याची खोटे कागदपत्रे तयार करुन त्यांना उपचार घेत असल्याचे बनावटपणे दाखविले आहे. 

तसेच, वरील आरोपीला कोणतीही गंभीर दुखापत झाली नसताना ते त्यांचे हॉस्पिटलमध्ये गंभीर दुखापतीवर दि. 27.04.2026 पासून दि. 09.05.2026 पर्यंत उपचार घेत असल्याचे गंभीर दुखापतीचे चुकीचे वैद्यकीय प्रमाणपत्र दिले आहे. त्यासाठी सदर डॉक्टरांनी बनावट आणि दिशाभूल करणाऱ्या अनेक वैद्यकीय नोंदी तयार केल्या आहेत, असा ठोस संशय प्रा. बिचितकर यांनी व्यक्त केला आहे. सदर डॉक्टरांनी दिलेल्या खोट्या वैद्यकीय प्रमाणपत्राच्या आधारावर यातील आरोपीने करमाळा पोलीस स्टेशनमध्ये एक खोटा गुन्हा दाखल करुन गंभीर गुन्ह्यातून बचाव करण्याचा प्रयत्न चालविला आहे. 

विषेश गंभीर बाब म्हणजे महाराष्ट्र मेडीकल कौन्सिलच्या अधिकृत संकेतस्थळावरुन प्राप्त झालेल्या माहितीनुसार डॉ. दादासाहेब माने यांच्या कौन्सिलकडे केलेल्या अधिकृत नोंदणीची वैधता दि. 28.02.2017 रोजीच समाप्त झाली असतानाही मागील नऊ वर्षांपासून  ते बोगसपणाने वैद्यकीय व्यावसाय चालवत आहेत. सदर डॉक्टरांनी केलेल्या गैरकृत्यामुळे पोलीस कारवाईत आणि न्यायप्रक्रियेत अडथळा निर्माण होऊन आरोपीस अनुचित लाभ मिळालेला आहे.

सदर डॉक्टरांनी केलेला वरील गैरप्रकार हा वैद्यकीय व्यवसायातील नैतिकता व कायदेशीर जबाबदारीच्या विरोधात आहे. त्यामुळे सदर डॉक्टरांनी केलेल्या या गैरकृत्याची सखोल चौकशी करून संबंधित डॉक्टरांवर आवश्यक ती शिस्तभंगाची कायदेशीर कारवाई करुन सदर हॉस्पिटलची नोंदणी रद्द करण्यात यावी, अशी मागणी प्रा. भारत बिचितकर यांनी महाराष्ट्र मेडीकल कौन्सिल आणि जिल्हा शल्य चिकित्सक यांचेकडे केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा