*कार्यकारी संपादक*
*एस. बी. तांबोळी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-8378081147*
इंदापूर तालुक्याचे युवा नेते श्री. प्रवीण माने यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करून समाजाप्रती असलेली बांधिलकी जपण्यात आली. शिक्षण, आरोग्य आणि सामाजिक सेवेचा संदेश देणाऱ्या या उपक्रमांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
यावेळी चांगदेव आबा ढुके यांच्या वतीने सोनाई परिवाराचे मुख्य कार्यकारी संचालक विष्णू कुमार माने यांच्या शुभहस्ते जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अगोती नं. २ व अगोती नं. ३ येथे विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी आवश्यक साहित्य उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. विद्यार्थ्यांनी तसेच शिक्षकांनी या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले.
तसेच प्रवीण भैया माने मित्रपरिवार यांच्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा माळवाडी नं. २ येथेही विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळावे व त्यांच्या शैक्षणिक गरजा पूर्ण व्हाव्यात, या उद्देशाने हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता.
आरोग्य क्षेत्रातही महत्त्वपूर्ण योगदान देत सोनाई दूध डेरी येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला युवकांसह नागरिकांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला. रक्तदान हेच श्रेष्ठ दान असल्याचा संदेश देणाऱ्या या शिबिरामध्ये तब्बल ७५१ बॉटल रक्तसंकलन करण्यात आले. गरजू रुग्णांच्या उपचारासाठी हे रक्त महत्त्वपूर्ण ठरणार असून रक्तदात्यांच्या सामाजिक जाणीवेचे सर्व स्तरांतून कौतुक करण्यात येत आहे.
युवा नेते श्री. प्रवीण माने यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेले हे सर्व उपक्रम समाजोपयोगी व प्रेरणादायी ठरले. वाढदिवस साजरा करण्याबरोबरच शिक्षण, आरोग्य आणि समाजसेवा या क्षेत्रांमध्ये योगदान देण्याचा आदर्श या माध्यमातून निर्माण झाला आहे.
या सर्व उपक्रमांच्या यशस्वी आयोजनासाठी योगदान देणारे चांगदेव आबा ढुके, प्रवीण भैया माने मित्रपरिवार, रक्तदाते, शिक्षक, ग्रामस्थ, कार्यकर्ते तसेच सर्व सहकाऱ्यांचे आयोजकांच्या वतीने आभार मानण्यात आले.






कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा