Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शुक्रवार, १२ जून, २०२६

*FDA आयुक्त,तुकाराम मुंडे यांनी दिला इशारा, गुटखा विक्रेत्यांवर असा लागणार मकोका अधिकाऱ्यांनाही दिला दम*

 *मुख्यसंपादक*

*टाइम्स 45 न्यूज मराठी*

*मो:-9730867448

मागील काही दिवसांपासून राज्यात एफडीए विभागाकडून धाडसत्र सुरू आहे. आयएएस अधिकारी तुकाराम मुंडे यांनी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तपदी जबाबदारी स्वीकारल्यानंतर कारवाईचा धडाका लावला आहे. 

आतापर्यंत केलेल्या कारवाईमध्ये ३ कोटी २७ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. अनेक ठिकाणी अवैध गुटखा, पान मसाल्याची विक्री होत असल्याचे समोर आले आहे. दरम्यान, आता आयएएस अधिकारी तुकाराम मुंडे यांनी उत्पादकापासून ते विक्री करणाऱ्यांवर मकोका लावणार असल्याचा इशारा दिला आहे. आज त्यांनी पत्रकार परिषद घेऊन राज्यातील कारवाई संदर्भात माहिती दिली.

या आधी मुंडे यांनी खाद्यपदार्थ वर्तमानपत्रात गुंडाळून विकू नका, अशा सूचना दिल्या आहेत. दरम्यान, आता गुटखा, तंबाखू किंवा निकोटीनयुक्त पानमसाला तसेच तत्सम तंबाखू-मिश्रित प्रतिबंधित अन्नपदार्थांचे उत्पादन, साठवणूक, वाहतूक, वितरण व विक्री करणाऱ्या संघटित नेटवर्कविरुद्ध पात्र प्रकरणांत महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम, १९९९ (मकोका) लागू करण्याबाबत सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांना तुकाराम मुंढे यांनी निर्देश दिले आहेत.

"उत्पादकापासून ते विक्री करणाऱ्यापर्यंत सगळ्यांना हा नियम लागू असून मकोका कायद्यानुसार गुन्हा दाखल केला जाईल. मकोका गुन्हा दाखल करण्यासाठी आरोपीचा इतिहास पाहून आवश्यक त्या गुन्ह्यानुसार कारवाई केली जाणार असल्याची माहिती मुंडे यांनी दिली.

...तर अधिकाऱ्यांवरही कारवाई होणार

राज्यात अवैध गुटखा विक्रीचे मोठे रॅकेट आहे. यावर मोठी कारवाई करावी लागणार आहे. गुटखा, तंबाखू किंवा निकोटीनयुक्त पानमसाला तसेच तत्सम तंबाखू मिश्रित प्रतिबंधित अन्नपदार्थाचे उत्पादन, साठवून, वाहतूक , वितरण आणि विक्री करणाऱ्या संघटीत नेटवर्क विरोधात मकोका लागू करण्याचे आदेश दिले आहेत, अशी माहिती मुंडे यांनी दिली. या रॅकेटमध्ये आमचे काही अधिकारी देखील इनवॉल्ड आहेत, असे आरोप होत आहेत. याची चौकशी आम्ही करत आहे. अधिकारी जर सहभागी असल्याचे आढळले तर त्यांच्यावरही कारवाई केली जाणार आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा