Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शनिवार, १३ जून, २०२६

*वाचनामुळे एक संस्कृती घडू शकते व समाजामध्ये सकारात्मक संस्कृती निर्माण होऊ शकते--- श्रीधर खेडकर*

 *मुख्यसंपादक*

*टाइम्स 45 न्यूज मराठी*

*मो:-9730867448*



वाचनामुळे एक संस्कृती घडू शकते आणि समाजामध्ये सकारात्मक संस्कृती निर्माण होऊ शकते असे प्रतिपादन 'वाचकदूत- श्रीधर खेडगी कर यांनी रोटरी क्लब ऑफ सोलापूरच्या पन्नासाव्या साप्ताहिक बैठकीनिमित्त यांच्या वतीने आयोजित वाचन अभियान आणि आपण या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते त्या प्रसंगी व्यक्त केले

        या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सोलापूर रोटरी क्लबच्या अध्यक्षा धनश्री केळकर होत्या



याप्रसंगी पुढे बोलताना  श्रीधर खेडगीकर  म्हणाले की आपल्या व्याख्यानात वाचन संस्कृतीचे महत्त्व, विशद करून प्रिसिजन वाचन अभियानाची सुरुवात, त्याची वाटचाल आणि विविध उपक्रमांची माहिती दिली. चांगले साहित्य वाचनामुळे व्यक्तिमत्त्व घडते, विचारांना चालना मिळते आणि समाजात सकारात्मक संस्कृती निर्माण होऊ शकते, असे त्यांनी सांगितले.


सोलापुरात प्रिसिजन बुक क्लबची स्थापना कशी झाली, विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी राबविण्यात येणारे उपक्रम, शाळांना पुस्तक भेट, बुकमार्क स्पर्धा तसेच वसतीगृहांमध्ये सुरू असलेल्या वाचन चळवळीची माहिती त्यांनी दिली. मागील वर्षभरात वाचकदूत म्हणून दररोज एक पुस्तक वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केल्याचेही त्यांनी नमूद केले.

मोबाईलच्या वाढत्या वापरामुळे कमी होत चाललेल्या वाचन संस्कृतीला नवसंजीवनी देण्यासाठी समाजातील विविध घटकांनी पुढाकार घेण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. शहरातील चौक, रुग्णालये आणि पोलीस ठाण्यांमध्ये पुस्तकांचे कोपरे निर्माण करण्याची संकल्पनाही त्यांनी मांडली.

यावेळी अध्यक्षा धनश्री केळकर यांनी व्याख्यानाबद्दल समाधान व्यक्त करत वाचन चळवळीसाठी रोटरी क्लब ऑफ सोलापूरकडून सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. सहसचिव पार्थ दावडा यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या शेवटी खेडगीकर यांनी रोटरी क्लबच्या अध्यक्ष व सचिवांना पुस्तके भेट दिली.

कार्यक्रमास ॲड. धनंजय (आबासाहेब) माने, अण्णासाहेब कोतली, डॉ. ज्योती चिडगुपकर, डॉ. नेहा जोशी, परशुराम कोकणे, सलाम शेख, राजेंद्र गांधी, भरत अय्यंगार, शिवाजी उपरे यांच्यासह रोटरीचे सदस्य आणि प्रिसिजन वाचन अभियानाचे कार्यकर्ते विकास धांडोरे, अच्युत काटीकर, नरहरी अघोर, पोळ सर व रघुनाथ क्षीरसागर उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा