इंदापूर, डॉ. संदेश शहा.
टाइम्स 45 न्यूज मराठी सहसंपादक मो. ९९२२४१९१५९
मूळचे बेडशिंगे ( ता. इंदापूर, जिल्हा पुणे ) येथील कपिल सुभाष मिसाळ यांची ॲथलेटिक्स फेडरेशन ऑफ महाराष्ट्र च्या महासचिवपदी निवड झाली असून ते स्पर्धे साठी दक्षिण आफ्रिका येथील ट्युनिशिया येथे रवाना झाले आहेत.
बेडशिंगे येथील सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक सुभाष मिसाळ यांचे ते चिरंजीव आहेत.
केंद्रीय क्रीडा मंत्रालय तसेच पॅराऑलिंपिक कमिटी ऑफ इंडिया यांच्या मान्यतेने सध्या थेरगाव येथे राहणारे कपिल मिसाळ यांची ॲथलेटिक्स फेडरेशन ऑफ महाराष्ट्र पॅराच्या महासचिवपदी नियुक्ती झाली आहे. विशेष म्हणजे अवघ्या वयाच्या ३३ व्या वर्षी महासचिवपदी निवड होणारे मिसाळ हे पहिलेच महाराष्ट्राचे सुपुत्र आहेत. त्यांचे खेळातील योगदान पाहून पॅरा ऑलिंपिक कमिटी ऑफ इंडिया चे जनरल सेक्रेटरी जी. एच. जयवंत यांनी ॲथलेटिक्स फेडरेशन ऑफ महाराष्ट्र च्या महासचिवपदी कपिल मिसाळ यांची नियुक्ती केली असून महाराष्ट्रातून देशाचे प्रतिनिधी म्हणून ते ट्युनिशिया येथे रवाना झाले आहेत. देशाच्या राष्ट्रपती भवन मध्ये उपराष्ट्रपती सी.पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते कपिल मिसाळ यांचा सत्कार करण्यात आला.
सामाजिक कार्य, क्रीडा प्रशासन आणि दिव्यांग खेळाडूंच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने कार्यरत असलेल्या मिसाळ यांनी आपल्या संघर्षमय प्रवासातून राष्ट्रीय स्तरावर स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. त्यांनी विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये तांत्रिक अधिकारी, पंच, स्पर्धा व्यवस्थापक आणि प्रशासकीय अधिकारी म्हणून उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. दिल्लीतील जागतिक दर्जाच्या पॅरा ॲथलेटिक्स स्पर्धां मध्ये त्यांनी मुख्य न्यायाधीश म्हणून जबाबदारी सांभाळली आहे. हा सन्मान केवळ माझा नसून महाराष्ट्रातील प्रत्येक दिव्यांग खेळाडू, प्रशिक्षक, पंच, तांत्रिक अधिकारी आणि क्रीडा क्षेत्रात योगदान देणाऱ्या सहकाऱ्यांचा आहे. राज्यातील पॅरा ॲथलेटिक्स अधिक सक्षम, संघटित आणि राष्ट्रीय स्तरावर अग्रस्थानी नेण्यासाठी मी पूर्ण क्षमतेने आणि प्रामाणिकपणे कार्य करणार असल्याचे कपिल मिसाळ यांनी सांगितले.





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा