Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

गुरुवार, २ जुलै, २०२६

अन्यायकारक स्मार्ट मीटरच्या विरोधात शनिवार दिनांक ४ जुलै रोजी इंदापूर बंद ची हाक.

 इंदापूर, डॉ. संदेश शहा.

गुरुवार, २ जुलै २६

टाईम्स 45 न्यूज मराठी सहसंपादक मो.९९२२४१९१५९



इंदापूर शहर नागरी संघर्ष समितीने येत्या

शनिवार दिनांक ४ जुलै २०२६ रोजी स्मार्ट मीटर च्या विरोधात

स्वयंस्फूर्तीने इंदापूर बंद ठेवण्याचे आवाहन

केले आहे.

यासंदर्भात इंदापूर नागरी संघर्ष समितीचे संस्थापक कृष्णा ताटे म्हणाले, संपूर्ण देशात  सक्तीने स्मार्ट वीज मीटर बसवले जात असून त्यामुळे नागरिकांना अनेक पटीने वीज बिल येत आहे. त्यामुळे नागरिक हैराण झाले असून त्यांना मानसिक त्रास देखील सहन करावा लागत आहे. महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीकडे अनेक वेळा स्मार्ट मीटर  बसवण्याच्या विरोधात  तक्रार केली, निवेदन दिले परंतु या तक्रारी कडे महावितरणने संपूर्ण दुर्लक्ष करून नागरिकांच्या पूर्व संमतीशिवाय स्मार्ट मीटर बसवत आहे. त्यामुळे नागरिक हैराण झाले असून सदरचा स्मार्ट मीटर बसवण्यास विरोध करीत आहेत. परंतु महावितरण ग्राहकाला माहिती

न देताच वीज मीटर बसवत आहे. वीज कायदा २००३

नुसार ग्राहकाच्या पूर्वसंमतीशिवाय

सुस्थितीत असलेला वीज मीटर बदलता येत नाही. याविरुद्ध ग्राहक वीज मंडळाकडे तक्रारी 

घेऊन गेल्यास त्याची दखल घेतली जात नाही म्हणून इंदापूरकर वीज ग्राहकांच्या

तक्रारीची दखल घेऊन इंदापूर शहर नागरी संघर्ष समितीने 

शनिवार दिनांक ४ जुलै २०२६ रोजी स्मार्ट मीटर च्या विरोधात

स्वयंस्फूर्तीने शहर बंद ठेवण्याचे आवाहन

केले आहे. तसेच जुन्या वीज मीटरचे रिडींगही चुकीचे दाखवून 

वीज बिले अव्वाच्या 

सव्वा येत आहे.

त्यामुळे आम्ही लोकशाही पद्धतीने आंदोलन छेडत आहोत. 

यावेळी हमीद आतार, महादेव चव्हाण, भारत बोराटे, हाजी सलीम बागवान, हनुमंत बोंगाणे, फकीर पठाण, सूर्यकांत गुंड, चंद्रकांत देवकर आदी मान्यवर उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा