Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

गुरुवार, २ जुलै, २०२६

*१५ जुलै नंतर अकलूज मधील नागरिकांना पिण्याचे पाणी नळाद्वारे उपलब्ध होईल ---मुख्याधिकारी, सचिन पाटील -अकलूज नगर परिषद*

 *मुख्यसंपादक*

*टाइम्स 45 न्यूज मराठी*

*मो:-9730867448*


अकलूज नगर परिषद कार्यक्षेत्रातील सर्व नागरिकांना कळविण्यात येते की, अकलूज नगरपरिषद करिता पाणीपुरवठा वीर धरणातून होतो. साठवण तलावातील पाण्याची स्थिती पाहून अकलूज नगरपरिषद मार्फत पाणी मागणी प्रस्ताव दिनांक 23 जून 2026 रोजी पाटबंधारे विभागास पाठवण्यात आला आहे. सद्यस्थितीत वीर धरणामध्ये अत्यल्प पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे अकलूज नगर परिषद साठवण तलावामध्ये पाणी उपलब्ध करून देण्यात आलेले नाही.                           



 त्यामुळे सध्या साठवण तलावात पाणी उपलब्ध नाही. पाटबंधारे विभागाकडील माहितीनुसार दिनांक 12 जुलै 2026 रोजी धरणातून पाणी सुटणार असून दिनांक 15 जुलै 2026 पर्यंत अकलूज नगरपरिषद साठवण तलावात पाणी उपलब्ध होईल. नगरपरिषदेकडील एकूण उपलब्ध ४६ बोअरवेल पैकी चालू ३४ बोअरवेल वरती सार्वजनिक कनेक्शनद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे. तसेच 10 टैंकर द्वारे जिथे बोअरवेल नाही तिथे पाणी पुरविण्यात येईल. सर्व नागरिकांना पाणी पुरवठा केला जाईल याची सर्व नागरिकांनी नोंद घ्यावी. तसेच उपलब्ध पाणी काटकसरीने वापरून नगरपरिषदेस सहकार्य करावे. कसे आवाहन अकलूज नगर परिषदेचे मुख्याधिकारी सचिन पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे


(सचिन पाटील) मुख्याधिकारी गट-अ (निवडश्रेणी) अकलूज नगरपरिषद, अकलूज

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा