*करमाळा तालुका --प्रतिनिधी*
*आलिम शेख*
*टाइम्स 45 न्यूज मराठी:
उप अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग करमाळा यांच्याकडे दोन महिन्यापासून पत्रव्यवहार करून आंदोलनाचा इशारा देऊन ही गतिरोधक बनवून मिळाला नाही कुंभेज फाटा ते रामवाडी रोडवरती
त्यामुळे अखेर 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनी बहुजन संघर्ष सेनेचे जिल्हाध्यक्ष तथा आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे संचालक राजाभाऊ कदम यांच्या नेतृत्वा खाली सर्व ग्रामस्थां च्या वतीने रस्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे
उमरड येथे कोठावळे शॉपिंग सेंटर जवळ धोकादायक कॉर्नर आहे याच ठिकाणी एका बाजूला रस्ता पूर्व सोगाव दिशेला जातो व दुसऱ्या बाजूला उमरड गावात बाजार तळात जातो जवळच प्राथमिक जिल्हा परिषद शाळा आहे या ठिकाणी गतिरोधक बनवून मिळावा.
तसेच चौधरी वलटे वस्ती या ठिकाणी रस्ता बोगद्यातून जातो व मोठा कॉर्नर आहे जवळच जिल्हा परिषद शाळा आहे या बोगद्यातूनच पोंधवडीच्या दिशेला एक रस्ता जातो त्यामुळे वलटे वस्ती जवळ गतिरोधक बनवून मिळवा.
आत्तापर्यंत या दोन्ही ठिकाणी अपघात होऊन पाच लोकांचा मृत्यू झाला आहे व दोन लोकांचे पाय मोडले आहेत आज रोजी दोघेजण दवाखान्यांमध्ये उपचार घेत आहेत तसेच विजय सोनवणे यांच्या घरावरती सिमेंट खडी घेऊन जाणारा दहा चाकी टिपर पलटी झाला आहे या सर्व अपघाताच्या प्रकारामुळे उमरड गावातील नागरिक संतप्त झाले असल्यामुळे 15 ऑगस्ट 2026 दिवशी रस्ता रोको करणार आहेत सदर निवेदनाच्या प्रती राजाभाऊ कदम यांनी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, तहसीलदार करमाळा, पोलीस निरीक्षक करमाळा सार्वजनिक बांधकाम विभाग अकलूज, उपविभाग करमाळा यांना दिले आहेत




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा