Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

गुरुवार, ६ ऑगस्ट, २०२६

*_न्यायालयाच्या आदेशातील अटी शर्तींचे पालन नझाल्यामुळे नैसर्गिक न्याय आधारावर शासन निर्णय नुसार रहिवासी व कार्यालयीन अतिक्रमणे कायम करा अन्यथा (माजी सैनिक) सावंत शिवाजी रामकृष्ण उपोषणाचा इशारा*_

 *मुख्यसंपादक*

*टाइम्स 45 न्यूज मराठी*

*मो:-9730867448*


तुळजापूर तालुक्यातील मौजे तामलवाडी येथील सन 1983 च्या मान्य देऊन दिवाणी न्यायालय कस तर तुळजापूर यांच्याकडील नि दि दा मधील एप्रिल 2026 च्या आदेशाप्रमाणे एका पक्षकाराने मोजेता मराठी येथील एका जमिनी संदर्भात दावा सादर केला होता ज्यामध्ये कोर्टाने काही अटी शर्तीसह उप अधीक्षक भूमि अभिलेख तुळजापूर यांची नकाशाप्रमाणे अतिक्रमणे काढणे कामी कोर्ट कमिशनर म्हणून नियुक्ती केली होती; ज्या कमी उपाधीक्षक भूमी अभिलेख तुळजापूर यांनी ०६ ऑगस्ट रोजी ०३:३० वाजता जायमोक्यावर पाहणी करणार असल्याचे कळवले होते व त्यावेळेचे अंदाजे ३७ व आत्ताचे ५० कुटुंबे सन १९८० ते १०९० च्या कालावधीपासून कायम राहणारी आहेत ज्यामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तामलवाडी ग्रामसचिवाले तामलवाडी पोलीस स्टेशन तामलवाडी अशी शासकीय कार्यालय त्यासोबत सध्या कायम रहवासी असणारे अंदाजे ५० कुटुंबे आहेत, ज्यामध्ये जवळपास निम्म्या लोकांना तहसील कार्यालय तुळजापूर मार्फत तेव्हाच्या शासन निर्णयाप्रमाणे राहण्याकरिता मोफत कबाले दिलेले होते व जवळपास निम्मे लोकांना लोकांनी तामलवाडी येथे तहसील कार्यालय तुळजापूर येथील दुय्यम प्रबंधक यांच्यामार्फत प्लॉट खरेदी केलेले आहेत ज्यामध्ये ग्रामपंचायत तामलवाडी च्या सौजन्याने शासकीय निधीमधून मूलभूत सुविधा जसे सिमेंट रस्ते, पिण्याचे पाणी, विज व्यवस्थापन करण्यात आलेले आहे;  यातील काही लोकांना शासकीय योजना मधून घरकुले ही वाटप झालेले आहेत.  



 दिनांक पाच ऑगस्ट 2026 रोजी माजी सैनिक सावंत शिवाजी रामकृष्ण तथा संस्थापक अध्यक्ष आशा बहुउद्देशीय सेवाभावी संस्था तामलवाडी यांच्या वतीने व श्री एकनाथ गायकवाड यांच्या सह अप्पर जिल्हा दंडाधिकारी तथा निवासी जिल्हाधिकारी धाराशिव श्री विद्याचरण चंद्रकला जगन्नाथ कडवकर व जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख धाराशिव यांची भेट घेऊन त्यांना ग्रामपंचायत तामलवाडी मधील शासकीय रेकॉर्ड ज्यामध्ये ८ अ, फेरफार नक्कल, खरेदी खते, तहसीलदार तुळजापूर यांनी दिलेले कबाले, घरपट्टी व पाणीपट्टी कर पावत्या व लाईट बिल यांच्या आधारे सर्व लोक सदरील जागेत मागील ४० ते ४५ वर्षापासून राहत आहेत त्यांचे घरे तेथे कायमस्वरूपी बनलेली आहेत ती घरे शासकीय नियमाप्रमाणे ग्रामपंचायत तामलवाडी येथे नोंदणीकृत असताना अतिक्रमण म्हणून पाडू नये,  संपूर्ण आयुष्य कष्ट करून त्यांनी तेथे घरी घर जागा खरेदी करून बांधलेले आहेत किंवा कबाले मिळाल्यानंतर बांधलेले आहेत त्यामधील सर्व जणांना सदरील न्यायप्रविष्ठ गोष्टीची पूर्ण कल्पना नव्हती तथा ज्या लोकांना तहसीलदार साहेबां मार्फत कबाली मिळाली त्यावेळी त्यांना याच जागा दाखवल्या गेले होत्या ज्या आता अतिक्रमित म्हणत आहेत अशा सर्व लोकांचे पुनर्वसन करण्यात यावे कारण सध्या पावसाळा असल्यामुळे राहण्याचा व आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे, ग्रामपंचायत तामलवाडी कार्यालयाच्या रेकॉर्ड ठेवण्याकरिता व्यवस्थापन करायचे आहे व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला आहे तसेच संबंधित जमिनीचा दावा करणाऱ्या व्यक्तीने माननीय न्यायालयाने आदेशित केलेल्या तांत्रिक अटी शर्तींचे पालन न केल्यामुळे सदरील मोजणी तत्काळ रद्द करावी व महाराष्ट्र शासनाच्या निर्णय क्रमांक २०२६/ प्र.क.२०/ जमिनी ०१ दिनांक २५ मार्च २०२६ प्रमाणे सध्याच्या सर्व ५० कुटुंबांचे व ०३ (तीन) शासकीय कार्यालयांचे अतिक्रमणे काढणे तत्काळ थांबून नियमित करून द्यावेत अन्यथा ग्रामपंचायत कार्यालय त्यामुळे आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे या चर्चेमध्ये योग्य तो सकारात्मक कायदेशीर तोडगा काढला जाईल असे आश्वासन वरील अधिकाऱ्यांनी श्री सावंत व एकनाथ गायकवाड यांना दिले आहे त्याबद्दल वरील दोन्ही अधिकाऱ्यांचे आश्वासनाबद्दल श्री सावंत यांनी आभार मानले आहे

*चर्चेला उधाण* : संबंधित जागेसंदर्भात तेथील राहणारे गरीब लोक व दावा करणारा व्यक्ती यांच्यामध्ये काही लोक समन्वयाचे नाटक करून प्रति गुंठा २,७५,००० पैशाची तडजोड करण्यासाठी उतावळे झालेल्या असून गरीबाच्या टाळूच्या वरचे लोणी खाणारे व असे चर्चेला उधाण आले आहे व सदरील बाबत राजकीय हेतू पुरस्कृत केले जात असतानाच श्री सावंत यांनी गोरगरिबांना प्रशासनामार्फत मोफत दिलासा देण्यासाठी प्रयत्न करत आहेत असे तामलवाडी पंचक्रोशीत चर्चेला उधाण आलेले आलेले आहे,  याबाबत आमच्या प्रतिनिधीने श्री सावंत यांच्याशी फोनद्वारे  विचारले असता त्यांनी प्रतिक्रिया दिली की, याबाबतीतील माहिती माझ्याकडे उपलब्ध नाही, जे जे लोक असे करत आहेत त्या लोकांशी जाऊन त्या संबंधित विषयाचा उलगडा करा व जर तसं असेल तर गोरगरीब जनतेला पैशासाठी वेटीस धरू नका ही माझी त्यांना विनंती आहे नाहीतरी येणाऱ्या निवडणुकीत लोक त्यांना धडा शिकवतील ही अपेक्षा आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा