Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

मंगळवार, ४ ऑगस्ट, २०२६

*अंबाजोगाई येथील सोफी संत इब्राहिम साहेब यांचे सुपुत्र आरेफ बाबा यांचे हृदयविकाराने दुःखद निधन*

 *मुख्य संपादक*

*टाइम्स 45 न्यूज मराठी*

  *मो:-9730867448*


अंबाजोगाई शहरातील पेन्शनपुरा येथील रहिवासी आणि मरहूम सोफी संत इब्राहिम साहेब यांचे ज्येष्ठ पुत्र आरेफ इब्राहिम ऊर्फ आरेफ बाबा यांचे सोमवारी, ३ ऑगस्ट रोजी रात्री हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने अकाली निधन झाले. या अनपेक्षित आणि क्लेशदायक घटनेने कुटुंबासह संपूर्ण परिसरात मोठी शोककळा पसरली आहे.



सोमवारी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास आरेफ बाबा यांना अचानक प्रकृती अस्वस्थ वाटू लागली. त्यामुळे त्यांना तत्काळ अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात तपासणी आणि उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने त्यांचे निधन झाले.

              महाराष्ट्रासह इतर राज्यातील त्यांचे शिष्य गण असून त्यांच्या आकस्मित निधनाने समाजात पोकळी निर्माण झाली असून समाज पोरका झाला आहे 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा