Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

बुधवार, १२ ऑगस्ट, २०२६

*पुण्यात ‘घर घर भक्तांमर, हर घर भक्तांमर’चा संकल्प*, *चातुर्मास मंगल कलश स्थापना महोत्सवात आचार्य १०८ श्री डॉ. प्रणामसागरजी महाराज यांच्या उपस्थितीत पावन ग्रंथ ‘भक्तामर के चमत्कार’ पुस्तकाचे प्रकाशन*.

 पुणे, श्रमण संदेश शहा.

११ ऑगस्ट २०२६

टाईम्स 45 न्यूज मराठी



परमपूज्य डॉ. अभिनव मानतुंगाचार्य आणि ज्योतिषी डॉ. १०८ श्री प्रणामसागरजी महाराज ( भक्तांमर’ वाले बाबा) यांच्या उपस्थितीत भक्तांमरमय चातुर्मास - पुणे २०२६ अंतर्गत चातुर्मास मंगल कलश स्थापना महोत्सव भक्ती आणि उत्साहाच्या वातावरणात संपन्न झाला. गंगाधाम, कोंढवा, पुणे येथील नजुश्री भवन येथे रविवार दिनांक ९ ऑगस्ट रोजी झालेल्या या धार्मिक सोहळ्याला जैन समाजातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी आचार्यश्री लिखित ‘भक्तांमर के चमत्कार’ ( मिरॅकल्स ऑफ भक्तांमर ) या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.


या चातुर्मास सोहळ्याला शोभा धारीवाल, अरविंद जैन, विलास राठोड, अचल जैन, बाळासाहेब धोका, चकोर गांधी, डॉ. कल्याण गंगवाल, अक्षय जैन, दिलीप मेहता आदी मान्यवर उपस्थित होते.


भक्तांमर प्रभावना चातुर्मास समिती मध्ये स्वप्नील पाटणी, मिलिंद फडे, विनय चुडीवाला, शीतल लोहाडे, मनीष जैन, डॉ. रवींद्र गांधी, संतोष नवाळे, अनुप शहा, राजेश सेठी, हितेश गांधी, सारंग शहा, वीरेंद्र शहा, हेमंत जैन, विनय जैन, अनिल जैन, अनिल पाटील, सुजाता शहा, वीरकुमार शहा, महावीर शहा (गोखळीकर) आदींचा समावेश होता. सकल जैन समाज, पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली रवींद्र कासलीवाल, अमित कासलीवाल, सतीश अजमेरा, प्रकाश गंगवाल, चित्रेश नरपटत्या यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले.


यावेळी उपस्थित भाविकांनी ‘घर घर भक्तांमर, हर घर भक्तांमर’ अंतर्गत प्रत्येक घरात आध्यात्मिक मूल्ये, सकारात्मकता आणि धार्मिक भावनांचा प्रसार करण्यासाठी भक्तांमर स्तोत्राचे पठण करण्याचा संकल्प केला. चातुर्मास हा आत्मपरीक्षण, ध्यान, संयम आणि धार्मिक उपासनेसाठी एक पवित्र काळ असून, या चातुर्मासात विविध धार्मिक व आध्यात्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. या चातुर्मासातील धार्मिक कार्यक्रमांमध्ये पुण्यातील संपूर्ण जैन समाजाने मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले. यावेळी उपस्थितांचे स्वागत स्वप्निल पटनी यांनी तर  मिलिंद फडे यांनी प्रास्ताविक केले. शीतल लोहाडे यांनी आभार मानले.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा