*अकलूज --प्रतिनिधी*
*केदार लोहकरे*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
कै.श्रीमती रत्नप्रभादेवी मोहिते-पाटील यांच्या १०२ व्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या मोफत आरोग्य शिबिरामध्ये ७६५ महिला व ५१० पुरूष अशा एकूण १२७५ रुग्णांनी लाभ घेतला असून त्यामध्ये तालुक्यातील लगतच्या तालुक्यातील रुग्णांनी लाभ घेतला आहे.अकलूजचे नगरसेवक युवानेते सयाजीराजे मोहिते- पाटील यांच्या संकल्पनेतून सदरच्या आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
जिजामाता कन्या प्रशाला, अकलूज येथे आयोजित केलेल्या मोफत आरोग्य शिबिराचे उद्घाटन माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी सहकार महर्षी साखर कारखान्याचे चेअरमन जयसिंह मोहिते-पाटील,शिक्षण प्रसारक मंडळाच्या संचालिका कु. स्वरुपाराणी मोहिते-पाटील, कार्यक्रमाचे आयोजक व अकलूज नगर परिषदेचे नगरसेवक युवा नेते सयाजीराजे मोहिते पाटील,सुप्रसिद्ध ह्दयरोगतज्ञ डाॅ.एम.के. इनामदार,डॉ.सतीश दोशी,डॉ. अपर्णा सरवदे बार्शी,डॉ.हिना शेख बार्शी,डॉ.श्रीकृष्ण रत्नपारखी,डॉ.मानसी गांधी,डॉ. सुरेश सूर्यवंशी,डॉ.अमोल शिंदे, डॉ.सचिन सावंत,डॉ.सविता गुजर,डॉ. रेवती राणे,डॉ.अपूर्व गिरमे,डॉ.जोत्स्ना गायकवाड,डॉ. भूषण चंकेश्वरा,डॉ.विश्वास कदम, डॉ.रावसाहेब गुळवे,डॉ.साईराज भोंगळे,डॉ निनाद फडे,डॉ.समीर दोशी,डॉ.तुषार शेंडगे,डॉ.संजय वाळेकर,डॉ.नितीन कुबेर,डॉ. अनिकेत काटकर,डॉ.आकाश देशमुख,डॉ.शकील पठाण,डॉ. माधुरी खताळ,डॉ.पाकीजा पठाण,डॉ.प्रिया कदम,डॉ.जागृती मगर,डॉ.मनिषा शिंदे,डॉ.अरुंधती खराडे-पाटील,डॉ.अभिजीत राजेभोसले,सहकार महर्षि कारखान्याचे कार्यकारी संचालक सुहास यादव,शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव अभिजित रणवरे, सहसचिव,हर्षवर्धन खराडे- पाटील,विविध संस्थांचे संचालक व इतर मान्यवर उपस्थित होते
सयाजीराजे मित्र मंडळ अकलूज,शंकरराव मोहिते- पाटील चॅरिटेबल हॉस्पिटल ट्रस्ट,शंकरनर अकलूज,शिक्षण प्रसारक मंडळ,अकलूज,सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील सहकारी साखर कारखाना लि.शंकरनगर-अकलूज,नर्गिस दत्त मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटल, बार्शी,उपजिल्हा रुग्णालय अकलूज व प्राथमिक आरोग्य केंद्र,शंकरनगर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या शिबिरात कर्करोग,नेत्ररोग, अस्थिरोग,हृदयरोग व रक्त तपासण्या करण्यात आल्या.
प्रस्ताविकात शिबिराचे आयोजक सयाजीराजे मोहिते पाटील म्हणाले,देशात ग्रामीण भागात कर्करोगाचे प्रमाण वाढत आहे.महिलांमध्ये स्तनाचा व गर्भाशयाच्या कर्करोगाचे प्रमाण अधिक आहे.दरवर्षी सुमारे तीन लाखांहून अधिक महिला या आजाराने बाधीत होतात.त्यांच्या मनातील भीती दूर व्हावी, आजाराचे निदान लवकर झाल्यास पुढील उपचार वेळेत मिळावेत.त्यांचा जीव वाचावा. कर्करोगासह महिलांच्या नेत्ररोग, अस्थिरोग,हृदयरोग व रक्ताच्या सर्व मोफत तपासण्या व्हाव्यात यासाठी या शिबिराचे आयोजन केले असल्याचे त्यांनी सांगितले.
डॉ.एम.के.इनामदार म्हणाले,रुग्णांच्या मनातील कर्करोगाची भीती घालवण्यासाठी व त्यांच्यावर मोफत उपचारासाठी अशा शिबिराची अत्यंत गरज आहे.या शिबिरातून एखाद्या रूग्णाचे प्राण वाचले तरी शिबिराचे यश आहे.डॉ.रेवती राणे म्हणाल्या,श्रीमती स्व. रत्नप्रभादेवी मोहिते-पाटील यांचे सामाजिक कार्य मोठे होते. समाजातील महिला कौटुंबिक जबाबदारी पार पडताना स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात.या शिबिरामुळे महिलांची आर्थिक बचत होणार असल्याने शिबिराचे आयोजक सयाजीराजे मोहिते पाटील यांनी एक स्तुत्य उपक्रम राबवल्याचे त्यांनी सांगितले.
या आरोग्य शिबिरास मदनसिंह मोहिते-पाटील, सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती अकलूज सौ. सुलक्षणादेवी जयसिंह मोहिते-पाटील,दिपकराव खराडे-पाटील,प्रदीपराव खराडे-पाटील यांनी भेट दिली.
या तपासण्यानंतर रुग्णांना १५ दिवसांची मोफत औषधे शंकरराव मोहिते पाटील चॅरिटेबल हॉस्पिटल ट्रस्टच्या वतीने देण्यात आली तसेच भविष्यात ट्रस्टच्या वतीने गरजू रुग्णांना डोळ्यांची मोफत शस्त्रक्रिया (मोतीबिंदू) करण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले,कार्यक्रमाच्या शेवटी डॉ.अभिजीत राजेभोसले यांनी आभार मानले.






कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा