Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

मंगळवार, ११ ऑगस्ट, २०२६

*नीरा व भीमा नदीच्या महापूरात मृत्यूशी खेळणारा संगमचा आवलीया मधुकर लावंड.*

 *अकलूज प्रतिनिधी*

  *केदार   लोहकरे* 

*टाइम्स 45 न्यूज मराठी*

मधुकर हंबीर लावंड (कोळी) वय ७१ वर्ष गेल्या चाळीस वर्षापासून नीरा नरसिंहपूर येथे होडी चालविण्याचा व्यवसाय करीत आहेत.भीमा नदी व नीरा नदीला जेव्हा महापूर येतो.त्यावेळेस स्वत:चा जीव धोक्यात घालून नागरिकांना मदत करीत सुरक्षित ठिकाणी पोहच करीत असतात.

             खूप वर्षापुर्वी नीरा नरसिंहपूरला जायला नीरा नदीवर व भीमा नदीवर पूल नव्हता त्यावेळेस होडीतूनच दळणवळण चालू असायचे.गेली अनेक पिढ्या ह्या होडी व्यवसाय हे कुटुंब करीत आहेत.पुर्वीच्या काळी संगम,नीरा नरसिंहपूर व शेवरे नीरा नरसिंहपूर येथील लोकांना होडीचा सर्रास वापर करीत होते.त्यावेळेस शेतकरी वर्ग त्याबद्दल वर्षातून एकदा शेतकरी बलुते (खंड) म्हणून धान्य देत होते.त्यामुळे कोळी परिवाराचा वर्षभराचा धान्याचा प्रश्न मिटायचा.

           सन २००५-०६ साली नीरा नरसिंहपूर येथे मोठा महापूर आला होता तेव्हा नृसिंह देवस्थानच्या मंदिरात आश्रयास आलेल्या कुटुंबांना महापूर ओसरू तोपर्यंत शासनाकडून आलेले अन्नधान्य,दुध,राॅकेल, साखर मंदिरात पोहचवण्याचे काम लावंड परिवाराने होडीतून केले आहे.एखाद्याच्या घरात पुराचे पाणी शिरले की त्या घरातील माणसं व घरातील सामान होडीतून सुरक्षित ठिकाणी पोहचवण्याचे काम केले आहे. होडी चालविण्याचे काम करीत असताना आजपर्यंत तीस लोकांचे प्राण होडीच्या मदतीने वाचवले आहेत.

         सन १९९५,२००५-०६ साली अचानक आलेल्या महापूरात लावंड यांच्या दोन होड्या वाहून गेल्या आहेत.पण आजकाल नीरा व भीमा नदीवर पूल झाल्यामुळे होडी व्यवसायावर थोडा फार परिणाम झाला आहे.तरी पण नीरा नरसिंहपूर येथील नृसिंह मंदिरात आलेले पर्यटक व देवाच्या दर्शनास आलेले भाविक नदीच्या संगमावर येवून होडीत बसवून नदीत फिरण्याचा आनंद घेत आहेत.त्यामुळे घराच्या संसाराला थोडी फार मदत होत आहे.इतर वेळेस मात्र शेतकऱ्यांच्या शेतातील बोअरच्या मोटारीचे काम करावे लागत असते.

             पुर्वीच्या काळी पंढरपूरात तयार केलेली होडी नदीच्या पात्रातून प्रवास करत नीरा नरसिंहपूर येथे तीन मुक्काम करत आणली जात होतो.पण आता भीमा व चंद्रभागा नदीवर अनेक बंधारे बांधण्यात आल्यामुळे पंढरपूरात तयार केलेली होडी टॅम्पोतून संगम गावात आणावी लागत आहे.पुर्वी होडी व्यवसाय बरोबर लावंड यांनी मासेमारीचा पण व्यवसाय केला.नीरा नदीतून वहात आलेले मासे दिवसाला वीस ते पंचवीस किलो सापडत होते.आता मासेमारीचा व्यवसाय बंद केला असून होडीच्या व्यवसायातून वर्षाला साठ हजाराचे उत्पन्न पर्यटक व भाविक भक्तांना फिरवून मिळत आहे.

*चौकट*

मुलांच्या शैक्षणिक कार्यात मधुकर लावंड यांचे मोलाचे योगदान.संगम (ता.माळशिरस) येथे सातवीपर्यंत जिल्हा परिषद शाळेत शिक्षण मिळायचे तर शेवरे (ता.माढा) येथील मुलांना इयत्ता सातवीपर्यंत शाळेत शिक्षण मिळत होते.त्यानंतर नीरा नरसिंहपूर येथील हायस्कूलला आठवीत मुलांना प्रवेश घ्यावा लागत होता पण दोन्ही नदीला पूर आल्यानंतर मुलांचे शैक्षणिक नुकसान होवू नये म्हणून संगम व शेवरे गावातील विद्यार्थीना होडीत बसवून शाळेत पोहचविण्याचे काम लावंड परिवाराने केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा