*मुख्यसंपादक*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-9730867448*
अकलुज पोलीस ठाणे, सोलापूर ग्रामीण यांची कारवाई
विना परवाना अग्निशस्त्रे बाळगणा-या ०६ गुन्हेगारांना ताब्यात घेवुन १०,४७,०००/- रु किंमतीचे १७अग्निशस्त्रे, ४७ जिवंत कॉडतुसे व ८,०००,००/- रु ची टाटा नेक्सॉन कार असे एकुण १८,४७,०००/-रुपयांचा माल हस्तगत.केला आहे
पोलीस ठाणे , अकलूज
गु.र.नं. ५६०/२०२६ भारतीय शस्त्र अधि. कलम ३,५, २५ सह बी.एन.एस कलम ३(५) तसेच महाराष्ट्र पोलीस अधि. कलम ३७ (१) (३), १३५ प्रमाणे
फिर्यादीचे नाव
पोहेका /१५८९ शिवकुमार रेवाप्पा मदभावी ने अकलुज पोलीस ठाणे,
गु.घ.ता.वेळ
अपराध क्रमांक व कलम
दिनांक १४/०८/२०२६ रोजी १७.१० वा.गु.दा.ता.वेळ
दिनांक १४/०८/२०२६ रोजी २१.१० वा.
माहिती प्राप्त अंमलदार
पोहेकॉ/१६२३ श्रीराम दिनेश पोरे
कारवाई करणारे अधिकारी व अंमलदार
अतुल कुलकर्णी पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण
. विजय कबाडे अपर पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण
श्रीमती प्रेरणा कट्टे अपर पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण पंढरपुर विभाग
. संतोष वाळके उपविभागीय पोलीस अधिकारी, अकलुज उपविभाग अकलुज यांचे मार्गदर्शनाखाली
पोलीस निरीक्षक निरज उबाळे अकलुज पोलीस ठाणे
सहा. पोलीस निरीक्षक विक्रम साळुंखे अकलुज पोलीस ठाणे सहा. पोलीस निरीक्षक अकुंश वाघमोडे अकलुज पोलीस ठाणे पोलीस उपनिरीक्षक विशाल कदम अकलुज पोलीस ठाणे,
पोहेकॉ/१६२६ श्रीराम दिनेश पोरे, पोहेकॉ/१५८९ शिवकुमार रेवाप्पा मदभावी, पोहेका /२११ राहुल सुग्रीव रणनवरे, पोहेकॉ/९७८ अमोल मोहण बकाल, पोहेका / १४०७ समीर लतीफ पठाण, पोना/११७७ दत्तात्रय पांडुरंग खरात, पोकॉ/५१ रणजित राजेंद्र जगताप, पोकॉ/७११ तुकाराम शिवाजी माने देशमुख, पोकॉ/८७५ विजय शशिकांत तवटे
त्याचप्रमाणे मा पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण यांचे पथकातील सपोफौ शरद कदम, पोहेकॉ/३९६ सुरज हेंबाडे, पोहेकॉ/१६५९ अनिल महादेव शिंदे, पोहेकॉ/११४ स्वप्नील गायकवाड, पोकॉ प्रविण मेटकरी सायबर पोलीस ठाणे
अटक दिनांक वेळ दि. १४/०८/२०२६ रोजी २२.१८ वा
आरोपीचे नाव१) विकास कैलास वजाळे वय ३१ वर्षे रा. परीते ता. माढा जि. सोलापूर,
२ ) राहुल सतिश माने वय ३४ वर्षे रा. वसंतदादा हौंसिंग सोसायटी, माजी सैनिक वसाहत, मिरज जि. सांगली
३) शनि भारत बनसोडे रा. अकोले खुर्द ता. माढा जि. सोलापूर
४) महादेव बाळासाहेब कोरके वय ३० वर्षे रा. कोरके वस्ती, करकंब ता. पंढरपुर जि. सोलापूर
५) प्रदिप पांडुरंग माने रा. चिक महुद ता. सांगोला जि. सोलापूर
६) विजय सदाशिव किरणगी वय ३४ वर्षे रा. शिवणुर ता. आटणी जि. बेळगाव राज्य कर्नाटक
७) अनिल पंचलाल मेहता वय ३२ वर्षे रा. रांजणगाव ता. वरला जि. बडवानी राज्य मध्यप्रदेश
८) सुमित नाना लवटे वय १९ वर्षे रा. भुईटे वस्ती, सांगोला ता. सांगोला जि. सोलापूर
जप्त मुददेमाल
१) १०,००,०००/- रुपये किंमतीचे देशी बनावटीचे १७ पिस्टल (अग्नीशस्त्रे)
२) ४७,०००/- रुपये किंमतीचे ४७ जिवंत काडतुसे (राउंड)
३) ८,००,०००/- किमतीची एक टाटा कंपनीची नेक्सॉन कार नं. एम एच ४५ ए ई ७००२१८,४७,०००/- रुपये किंतीचा जप्त मुददेमाल एकुणगुन्हयाची थोडक्यात हकिकत :- दिनांक १४/०८/२०२६ रोजी अकलुज पोलीस ठाणेचे पोहेकॉ/१६२३
श्रीराम पोरे यांना गोपनीय बातमीदारांकडुन खात्रीशीर माहिती मिळाली की, इसम नामें विकास कैलास वजाळे रा. परीते ता. माढा जि. सोलापूर त्याचे वर्णन काळे सावळे रंगाचा, त्याचे चेहऱ्याचे डावे बाजुस कोड असलेला, त्याचे अंगावर पांढरा फुल बाहीचा शर्ट व राखाडी रंगाची जिन्स पॅन्ट घातलेला त्यांचेकडील टाटा कंपनीची नेक्सॉन कार नं एम एच ४५ ए ई ७००२ मधुन विनापरवाना, बेकायदेशीर देशी बनावटीचा कट्टा (अग्नीशस्त्र) विक्रीसाठी अकलुज ते टेंभुर्णी जाणारे रोडवर पतंगे मटन हॉटेल, संगम ता. माळशिरस येथे दुपारी ३.०० वाचे सुमारास येणार असल्याबाबत माहिती मिळाली. सदरची माहिती पोहेकॉ / १६२३ श्रीराम पोरे यांनी श्री संतोष वाळके उपविभागीय पोलीस अधिकारी, अकलुज उपविभाग अकलुज व पोलीस निरीक्षक श्री निरज उबाळे यांना कळविली. त्याप्रमाणे श्री. निरज उबाळे पोलीस निरीक्षक अकलुज पोलीस ठाणे यांनी सदर माहिती वरीष्ठांना कळविली. व अकलुज पोलीस ठाणे कडील पोउपनि/विशाल कदम तसेच पोहेकॉ/१५८९ शिवकुमार मदभावी पोकॉ/५१ जगताप, पोकॉ/७११ माने देशमुख तसेच नियंत्रण कक्षाकडील पोहेका /१६५९ अनिल शिंदे, पोहेकॉ/३९६ सुरज हेंबाडे, सपोफो कदम, पोहेकॉ / ११४ स्वप्निल गायकवाड यांचे पथक तयार करून दिनांक १४/०८/२०२६ रोजी इसम नामे विकास कैलास वजाळे वय ३१ वर्षे रा. परीते ता. माढा जि. सोलापूर हा ०२ पिस्टल (अग्नीशस्त्रे) व ०४ जिवंत काडतूसे (राऊण्ड) व वाहनासह मिळून आला आहे. आरोपीने सोलापूर जिल्हयामध्ये मा. जिल्हाधिकारी सो, सोलापूर याचेकडील गृह-जा.क्र. २०२६/डिसीबी-२/आर आर ३६०९ दिनांक ०३/०८/२०२६ अन्वये महा. पोलीस अधि. कलम ३७(१) (३) चा आदेश लागू असताना त्यांचा भंग करुन, त्याचे कब्जात एकूण ०२ पिस्टल (अग्निशस्त्रे), ०४ जीवंत काडतूसे (राऊण्ड) व वाहनासह बेकायदा बिगर परवाना बाळगले स्थितीत एकूण ९,२४,०००/-रुपयांचा मालासह मिळून आले आहेत. सदरची सर्व पिस्टल (अग्निशस्त्रे), जीवंत काडतूसे राहुल सतिश माने रा. मिरज जि. सांगली यांचेकडून विक्रीकरीता विकत घेतलेली आहेत. म्हणून आरोपी १) विकास कैलास वजाळे वय ३१ वर्षे रा. परीते ता. माढा जि. सोलापूर, २) राहुल सतिश माने रा. मिरज जि. सांगली यांचेविरुध्द भारतीय शस्त्र अधिनियम कलम ३, ५, २५ सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७(१) (३),१३५ प्रमाणे सरकार तर्फे पोहेकॉ/१५८९ शिवकुमार मदभावी यांनी फिर्याद दिली आहे.
सदर गुन्हयातील अटक आरोपी नामे विकास कैलास वजाळे वय ३१ वर्षे रा. परीते ता. माढा जि. सोलापूर याचेकडे सदरची पिस्टल (अग्निशस्त्रे), जीवंत काडतूस हे कोठुन आणले, याबाबत तपास करता त्यांने त्याचा साथिदार राहुल माने याचे सोबत मोठया प्रमाणात पिस्टल (अग्निशस्त्रे) व जीवंत काडतूस ही त्यांना अनिल पंचलाल मेहता रा रांजणगाव ता वरला जि बडवाणी राज्य मध्यप्रदेश याचेकडुन विक्रीसाठी आणुन ते अकोले ता. माढा, करकंब ता. पंढरपुर, चिक महुद ता. सांगोला, मिरज जि. सांगली तसेच इतर गावातील इसमांना विक्री केले असल्याचे सांगितले व त्याचेकडे सदर पिस्टल (अग्निशस्त्रे) व जीवंत काडतूस विक्री केलेल्या इसमांची माहिती विचारता विकास कैलास वजाळे याने १) शनि भारत बनसोडे रा अकोले खु ता माढा जि सोलापूर यास ०१ पिस्टल (अग्निशस्त्रे) व ०२ जीवंत काडतूसे, २) महादेव बाळासाहेब कोरके रा कोरकेवस्ती करकंब ता पंढरपुर यास यांना ०१ पिस्टल (अग्निशस्त्रे) व ०२ जीवंत काडतूसे, ३) प्रदिप पांडुरंग माने रा चिकमहुद ता सांगोला यास ०१ पिस्टल (अग्निशस्त्रे) व ०२ जीवंत काडतूसे, ४) विजय सदाशिव किरणगी रा. शिवपुर ता. आटणी जि. बेळगाव राज्य कर्नाटक यांस ०१ पिस्टल (अग्निशस्त्रे) व ०२ जीवंत काडतूसे, ५) सुमित नाना लवटे रा. भुईटे वस्ती, सांगोला ता. सांगोला जि. सोलापूर यास ०१ पिस्टल (अग्निशस्त्रे) व ०२ जीवंत काडतूसे विक्री केल्याचे सांगितले. त्याप्रमाणे आरोपी महादेव बाळासाहेब कोरके रा कोरकेवस्ती करकंब ता पंढरपुर यास ताब्यात घेवुन त्याचेकडुन ०१ पिस्टल (अग्निशस्त्रे) व ०२ जीवंत काडतूसे जप्त करण्यात आली आहे. आरोपी विजय सदाशिव किरणगी रा. शिवणुर ता. आटणी जि. बेळगाव राज्य कर्नाटक यास ताब्यात घेवुन त्याचेकडुन ०१ पिस्टल (अग्निशस्त्रे) व ०२ जीवंत काडतूस जप्त करण्यात आले आहेत. तसेच प्रदिप पांडुरंग माने रा चिकमहुद ता सांगोला याचे घराची घरझडती घेवुन त्याचे घरातुन ०१ पिस्टल (अग्निशस्त्रे) व ०२ जीवंत काडतूसे हस्तगत करण्यात आलेली आहेत तसेच शनी भारत बनसोडे रा अकोले खु ता माढा याचे घराची घरझडती घेवुन त्याचे घरातुन ०१ पिस्टल (अग्निशस्त्रे) व ०२ जीवंत काडतूसे
हस्तगत करण्यात आलेली आहेत.सदर गुन्हयाचे तपासामध्ये अटक आरोपी विकास कैलास वजाळे याने गुन्हयातील अग्निशस्त्रे सोनगीर ता.जि धुळे येथे इसम नामे अनिल पंचलाल मेहता रा राजंणगाव ता वरला जि बडवाणी राज्य मध्यप्रदेश हा दिनांक १६/०८/२०२६ रोजी सोनगिर जि धुळे येथे अग्निशस्त्र देण्यास येणार असलेबाबत माहिती सांगुन त्याचे वर्णन व त्याचा फोटो दाखविला. त्याप्रमाणे दि. १५/०८/२०२६ रोजी अकलुज पोलीस ठाणेकडील सपोनि/अंकुश वाघमोडे, पोहेकॉ/१५८९ शिवकुमार मदभावी, पोहेकॉ / २११ राहुल रणनवरे, पोहेकॉ/१६५९ अनिल शिंदे, पोहेकॉ/११४ स्वप्नील गायकवाड, पोकॉ/५१ रणजित जगताप यांचे पथक तयार करुन ते सोनगीर ता. जि. धुळे येथे जावुन आरोपी विकास वजाळे याने दिले माहिती प्रमाणे व वर्णनाप्रमाणे एक इसम हा हातामध्ये एक पिशवी घेवुन सोनगीर, धुळे येथील एका बंद हॉटेल समोर संशयितरित्या रोडवर फिरताना मिळुन आला. त्याला शिताफीने ताब्यात घेवुन त्याचेकडील एकुण ०४ अग्निशस्त्रे व २५ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आले आहेत. सदर पथक परत अकलुज पोलीस ठाणेस येत असताना उपरोक्त गुन्हयातील पाहिजे आरोपी नामे राहूल राहूल सतिश माने रा. मिरज जि. सांगली हा टेंभुर्णी ता. माढा जि. सोलापूर परिसरात असल्याची गोपणीय माहिती प्राप्त झाल्याने सपोनि/अंकुश वाघमोडे व स्टाफ असे सदर ठिकाणी जावुन शोध घेतला असता सोबतचा इसम नामें आरोपी अनिल पंचलाल मेहता याचे मदतीने राहुल सतिश माने रा वसंत दादा हौंसीग सोसायटी, माजी सैनिक वसाहत, मिरज ता मिरज जि सांगली यास ताब्यात घेवुन त्यांना सदर गुन्हयात अटक करण्यात आली आहे. सदर गुन्हयातील आरोपी नामें राहुल सतिश माने हा उमदी पोलीस ठाणे जि. सांगली गु र नं १३८/२०२६ बी.एन.एस १०३, ३(५) सह भा. ह. अधि ३, २५ प्रमाणे दाखल गुन्हयात फरार आरोपी आहे.
त्याचप्रमाणे सदर गुन्हयाचे तपासामध्ये अटक आरोपी नामे विकास कैलास वजाळे वय ३१ वर्षे रा. परीते ता. माढा जि. सोलापूर याचेकडे तपास केला असता त्यांनी सांगोला ता. सांगोला सुमित नाना लवटे रा. भुईटे वस्ती, सांगोला यांना ०१ पिस्टल (अग्निशस्त्रे) व ०२ जीवंत काडतूसे विक्री केले असल्याचे सांगितले. सपोनि/विक्रम साळुंखे यांनी सुमित नाना लवटे यास ताब्यात घेवुन त्याचे कडुन ०१ पिस्टल (अग्निशस्त्रे) व ०२ जीवंत काडतूसे जप्त करण्यात आले आहे. तसेच अटक आरोपी राहुल सतीश माने रा वसंतदादा हौसींग सोसायटी, माजी सैनिक वसाहत मिरज ता मिरज जि सांगली याचेकडे तपास केला असता त्यांने निवेदन पंचनाम्याने ०६ पिस्टल (अग्निशस्त्रे) व ०८ जीवंत काडतूसे काढुन दिल्याने जप्त करण्यात आले आहे.
सदर अटक आरोपी यांचेकडे कोणत्याही प्रकारचा पिस्टल व जिवंत काडतुसे बाळगण्याचा परवाना नसलेबाबत निदर्शनास आलेले आहे. सदर गुन्हयात आरोपी नामे १) विकास कैलास वजाळे वय ३१ वर्षे रा. परीते ता. माढा जि. सोलापूर, २) राहुल सतिश माने वय ३४ वर्षे रा. वसंतदादा हौंसिंग सोसायटी, माजी सैनिक वसाहत, मिरज ता. मिरज जि. सांगली ३) महादेव बाळासाहेब कोरके वय ३० वर्षे रा. कोरके वस्ती, करकंब ता. पंढरपुर जि. सोलापूर ४) विजय सदाशिव किरणगी वय ३४ वर्षे रा. शिवणुर ता. आटणी जि. बेळगाव राज्य कर्नाटक ५) अनिल पंचलाल मेहता वय ३२ वर्षे रा. रांजणगाव ता. वरला जि. बडवानी राज्य मध्यप्रदेश ६) सुमित नाना लवटे वय १९ वर्षे रा. भुईटे वस्ती, सांगोला ता. सांगोला जि. सोलापूर यांना अटक करण्यात आलेली असुन मा. न्यायालयाने त्यांना दि. २१/०८/२०२६ रोजी पर्यत पोलीस कोठडी रिमांड दिली आहे. आरोपी नामे १) प्रदिप पांडुरंग माने रा. चिक महुद ता. सांगोला जि. सोलापूर, २) शनि भारत बनसोडे रा. अकोले खुर्द ता. माढा जि. सोलापूर हे सध्या फरारी आहेत. सदर गुन्हयाचा अधिक तपास विक्रम सांळुखे सहा पोलीस निरीक्षक अकलुज पोलीस ठाणे हे करीत आहेत.
जिल्हयात अवैध अग्निशस्त्रे, शस्त्रे, शरिराविरुध्दचे गुन्हे करणारे इसमांवर प्रभावी कारवाई करण्याची सदरची मोहिम चालु ठेवण्यात येणार आहे.
(अतुल कुलकर्णी)
पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा