*अकलूज--- प्रतिनिधी*
*केदार लोहकरे*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
अकलूज येथील महाराष्ट्र राज्य जनसेवा संघटना आयोजीत नागपंचमी महोत्सवात पैठणी स्पर्धेतील प्रथम क्रमांकाच्या मानकरी कादंबरी सूर्यवंशीना पैठणी तर,उप विजेत्या पूजा शिंदेना सोन्याची नथ देण्यात आली.रीलमेकींग स्पर्धेत वैशाली वाघमारेनी प्रथम क्रमांक पटकावला.
येथील धवल श्रीराम मंदिरात नागपंचमीनिमित्त दोन दिवसीय महोत्सवात मुली व महिलांसाठी रांगोळी,मेहंदी, पाककला,सौंदर्यप्रसाधन,निबंध, वक्तृत्व,रीलमेकींग तसेच पैठणीच्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.
सौ.उर्वशीराजे मोहिते-पाटील यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन तर पद्मजादेवी मोहिते-पाटील करण्यात आले तर रीलस्टार सारिका देवरुखकर यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले
यावेळी ग्रामीण महिला व मुलींनीही आपल्या कामातून वेळ काढत किंवा करत असलेल्या कमाचीच रील काढून त्यातून जनतेला संदेश देण्याचे आवाहन सारिका देवरुखकर यांनी केले.
अकलूज सारख्या ग्रामीण भागातील महिलांना आपल्या कला सादर करून नागपंचमीचा आनंद घेण्यासाठी स्वतंत्र व सुरक्षीत असे व्यासपीठ स्व.प्रतापसिंह मोहिते पाटील यांनी हा उपक्रम गेल्या २५ वर्षांपूर्वी सुरू केला.तो पुढे डॉ. धवलसिंह मोहिते-पाटील यांनी सुरू ठेवली असून महिलांची सुरक्षित व स्पर्धेच्या संधीचा लाभ महिलांनी घ्यावा,त्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन व उत्तेजन देण्यासाठी त्यांनी विविध बक्षिसे ही ठेवली असून आता ज्यांना बक्षिस मिळाली नाहीत,त्यांनी पुढील वर्षीही सहभागी होऊन बक्षिसे मिळावीत असे आवाहन पदमजादेवी मोहिते पाटील यांनी केले.
पैठणी स्पर्धेत शेवटी ५२ महिला उतरल्या होत्या.त्यातून वेगवेगळ्या स्पर्धेतून विजेता व उप विजेता निवडल्या.सांगलीचे आर.जे. बंड्या यांनी या स्पर्धेसाठी निवेदनाचे काम केले.
रीलमेकींगमध्ये शिवानी कांबळे द्वितीय तर मिनाज शेख व गौरी भोसले यांना विभागून तृतीय क्रमांक देण्यात आला.रांगोळी स्पर्धेत अनुक्रमे कादंबरी सूर्यवंशी,दिव्या आदलिंगे व राणी खरात,मेहंदीमध्ये कोमल नाळे, दिव्या आदलिंगे व वनिता पवार, पाककलेत गौरी भोसले,शीतल ताम्हाणे व नसरीन बागवान तृतीय,मेकअप स्पर्धेत अफसाना मुलाणी,अमृता जगताप व स्वप्नाली घोगरे तृतीय,निबंध स्पर्धेत रुपाली पताळे,क्रांती कानडे, तर वैशाली सुळे व जयश्री गोडसे विभागून तृतीय, वक्तृत्व स्पर्धेत चैताली भंडारे, क्रांती कानडे व वनिता पवार तृतीय याप्रमाणे विजेत्या ठरल्या.
परीक्षण वर्षा माने, उमेश शिंदे, आर.जे. बंड्या, पूजा झांबरे, राम देवरुखकर व ज्योती कुंभार यांनी परीक्षण केले.







कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा