इंदापूर, डॉ. संदेश शहा.
टाईम्स 45 न्यूज मराठी सहसंपादक मो. ९९२२४१९१५९
भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त टाटा मोटर्सचे इंदापूर येथील अधिकृत डीलर जय ऑटोमोटिव्हचे विकास वरे, अमोल वरे, संदीप वरे यांच्या मार्गदर्शना खाली तसेच जय ऑटोमोटीव्ह चे जनरल मॅनेजर चंद्रशेखर कुंभार साहेब यांच्या सूचने वरून माजी सैनिक सन्मान सोहळा संपन्न झाला.यानिमित्त माजी सैनिकांचे देशासाठी योगदान अधोरेखित करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी जय हिंद आजी-माजी सैनिक संघटना इंदापूर चे तालुकाध्यक्ष मारुती मारकड, उपाध्यक्ष लक्ष्मण घोगरे, कार्याध्यक्ष तानाजी मोरे, सचिव रविराज पवार, खजिनदार बाजीराव शिंदे, मेजर कैलास गवळी व त्यांचे सहकारी उपस्थित होते. इंदापूर तालुक्यामध्ये ४७० हून अधिक माजी सैनिक बांधव या संघटनेत सहभागी आहेत. भारतरत्न रतनजी टाटा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. भारतीय सैन्याशी टाटा परिवाराचे असलेले संबंध आणि टाटा परिवाराचे देशप्रेम याचा उल्लेख यावेळी अध्यक्ष मारुती मारकड यांच्यासह सैनिक बांधवांनी आपल्या भाषणात व्यक्त केला.
टाटा शोरूम चे टीम लीडर केदार नगरकर आणि वर्कशॉप मॅनेजर प्रथमेश यमगर यांनी सैनिकांचा सन्मान व आभार व्यक्त केले.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा