*अकलूज--- प्रतिनिधी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो;-9730867448*
महाराष्ट्र राज्य जनसेवा संघटनेच्या सोलापूर शहर कार्यकारिणीतील नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना प्रदेशाध्यक्ष डॉ. धवलसिंह मोहिते-पाटील यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.
यामध्ये शिरीष विष्णू जगदाळे यांची शहर अध्यक्षपदी, प्रशांत सुधाकर देशमुख व अजित आबाजी पाटील यांची शहर उपाध्यक्षपदी, दिलीप रामलाल निंबाळकर यांची शहर संघटकपदी, तर ज्योतिबा सौदागर गुंड व अजय अरुण सोमदळे यांची कार्यकारिणी सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली.
नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी जनसेवेचा विचार, संघटनेची ताकद आणि समाजहिताचा संकल्प घेऊन संघटनेच्या कार्याला अधिक बळ देण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.
या प्रसंगी जनसेवा संघटनेचे जिल्हा सरचिटणीस दीपक पिंजारे, जिल्हा उपाध्यक्ष संग्राम जाधव, दादासाहेब नामदास, राहुल जाधव, संदिप कोकाटे आदी मान्यवर उपस्थित होते. नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे उपस्थित मान्यवरांनी अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा