Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

बुधवार, १२ ऑगस्ट, २०२६

*आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात लोप पावत चाललेली महाराष्ट्राची लोककला जतन व्हावी - जयसिंह मोहिते- पाटील* रत्नाई पारंपारिक नागपंचमी समुहनृत्य स्पर्धा संपन्न.

 *अकलूज प्रतिनिधी*

  *केदार   लोहकरे* 

*टाइम्स 45 न्यूज मराठी*


शिक्षण प्रसारक मंडळ अकलूज व प्रताप क्रीडा मंडळ शंकरनगर- अकलूज यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या मुलींच्या रत्नाई पारंपारिक नागपंचमी समुहनृत्य स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न झाली.मुलींनी जुन्या व पारंपारिक गाण्याचा तालावर पारंपारिक नृत्य करून रसिकांना मंत्रमुग्ध केले.


           शंकरनगरच्या स्मृतीभवन येथे मोठ्या दिमाखात या स्पर्धा संपन्न झाल्या.या स्पर्धेचे उद्घाटन सौ.सुलक्षणादेवी मोहिते-पाटील यांचे हस्ते झाले.यावेळी ग्रामीण भागातील लोककलेचे जनक जयसिंह मोहिते-पाटील,प्रताप क्रीडा मंडळाच्या अध्यक्षा कु. स्वरूपाराणी मोहिते-पाटील, सौ.ऋतुजादेवी मोहिते-पाटील, सौ.सुनयना जगताप,अकलूज नगरपरिषदेचे नगरसेवक  सयाजीराजे मोहिते-पाटील, दिपकराव खराडे-पाटील,सचिव अभिजीत रणवरे,सहसचिव हर्षवर्धन खराडे-पाटील,विविध संस्थांचे पदाधिकारी व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

                         कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात कु.स्वरुपाराणी मोहिते पाटील म्हणाल्या,जयसिंह मोहिते पाटील यांच्या संकल्पनेतून मागील पन्नास वर्षांत सुमारे ४० हुन अधिक भव्यदिव्य कार्यक्रमाचे आयोजन करून सामाजिक बांधिलकी जपली आहे.महिलांच्या पारंपारिक खेळासाठी प्रसिद्ध असलेले अकलूज येथे देशातील पहिलीच स्पर्धा आहे. मागील तीन वर्षांपासून शिवपार्वती मंदिर परिसरात महिलांसाठी पारंपारिक खेळाचे आयोजन सुरु केले असून गतवर्षी वीस हजाराहून अधिक महिलांनी या सोहळ्याचा आनंद घेतला आहे.महिलांना घरकामातुन विरंगुळा मिळावा, आपली संस्कृती जोपासावी, महिलां व मुलींना व्यासपीठ मिळावे हा हेतू आहे.

                   यावेळी जयसिंह मोहिते-पाटील मार्गदर्शन करताना म्हणाले,आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात लोप पावत चाललेली महाराष्ट्राची लोककला जतन व्हावी यासाठी स्पर्धेचे आयोजन केले जातआहे.भारतीय परंपरा महिलांनी जिवंत ठेवली पाहिजे व पूर्वीची लोककला,खेळ,ग्रामीण संस्कृती पुन्हा निर्माण व्हावी या करिता पुढील वर्षी महिलांच्याही स्पर्धा आयोजित करणार असल्याचे त्यांनी सांगितले. दरवर्षीप्रमाणे यावर्षी शिवपार्वती मंदिर परिसरात दि.१६ व १७ रोजी महिलांसाठी नागपंचमी सण सोहळ्याचे आयोजन केले असून यामध्ये मोठ्या संख्येने महिलांनी सहभागी होण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

           या स्पर्धेचो परीक्षक म्हणून योगेश देशमुख,कुणाल मसाले, पूजा क्षिरसागर  यांनी काम पाहिले.फुगडी,झिम्मा, गौरीचा सण,वारुळ,सुप,घागर, उखाणा,गोफ, मंगळागौर,हांडे, पिंगा आदींच्या पारंपारिक गीतांतून सर्वच संघांनी दर्जेदार सादरीकरण केले.उपस्थित रसिकांनी त्यांना मनमुराद दाद दिली.प्रताप क्रीडा मंडळाचे उपाध्यक्ष पोपटराव भोसले पाटील,सचिव बिभीषण जाधव पाटील यांनी आभार मानले.

*चौकट*

सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील प्रशालाने प्रथम क्रमांकाचे एक लाख रूपयांचे बक्षीस पटकावले.या स्पर्धेतील द्वितीय क्रमांक विभागून सदाशिवराव माने विद्यालय अकलूज,जिजामाता कन्या प्रशाला अकलूज व लक्ष्मीबाई कन्या प्रशाला शंकरनगर या संघांना प्रत्येकी ७१ हजार रुपयांचे बक्षीस देण्यात आले तर सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च शंकरनगर,श्रीमती रत्नप्रभादेवी मोहिते पाटील महिला गृहविज्ञान महाविद्यालय अकलूज व शंकरराव मोहिते महाविद्यालय अकलूज यांना प्रत्येकी ५० हजार रुपयांचे अनुदान देण्यात आले. सदरचा बक्षीस समारंभ सौ. सुनयना जगताप व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा