*अकलूज प्रतिनिधी*
*केदार लोहकरे*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
माळशिरस तालुक्यातील माळेवाडी-अकलूज येथे संत शिरोमणी सावता माळी महाराज यांच्या ७३१ वी संजीवन समाधी सोहळा मोठ्या उत्साहात व भक्तीमय वातावरणात संपन्न झाला.सकाळपासून विविध धार्मिक कार्यक्रम आयोजन करण्यात आले होते.
सकाळी संत सावता माळी यांच्या मंदिरातील महापूजा व दुपारची आरती तेजस जालिंदर फुले यांच्या हस्ते करण्यात आली.
दुपारी कीर्तनकार ह.भ.प.धनंजय महाराज गुरव धोंडेवाडी (झी टाॅकीज फ्रेम) याचे सुश्राव्य किर्तनाने श्रोते मंत्रमुग्ध झाले होते.त्या नंतर प्रजापिता ब्रह्माकुमारीस ईश्वरीय विश्व विद्यालय माउंट आबू राजस्थान शाखा अकलूज व भारत सरकार यांच्या वतीने १० कोटी नशा मुक्त अभियाना अंतर्गत व्यसन मुक्ती ची प्रतिज्ञा करण्यात आली. ब्रह्माकुमारी शिवरात्री बहेनजी व प्रीति बहेनजी यांनी प्रतिज्ञा करून घेतली व ध्यानधारणाचे महत्व सांगितले.यावेळी क्लास वन वैद्यकीय अधिकारीपदी डाॅ.अमेय फुले व सोलापूर विद्यापीठात एम.एससी. इलेक्ट्रॉनिक्स विषयात प्रथम क्रमांक आल्याबद्दल संजीवनी शंकर बनकर यांचा सत्कार प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते शाल हार व श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमास अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मदनसिंह मोहिते- पाटील,अकलूज नगरपरिषदेच्या पहिल्या नगराध्यक्षा सौ.रेश्माताई अडगळे,नगरपरिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी सचिन पाटील,माजी जिल्हा परिषद सदस्य जालिंदर भाऊ फुले, विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन प्रकाशराव शंकरराव एकतपुरे,नगरसेवक नामदेव नाना गलांडे,नगरसेविका सौ.स्वाती राजेंद्र फुले,नगरसेवक अझरुद्दीन शेख,महर्षी शंकरराव मोहिते- पाटील साखर कारखान्याचे संचालक भारत आप्पा फुले, सामाजिक कार्यकर्ते लालासाहेब अडगळे,अशोकराव जावळे, डाॅ.अमोल माने शेंडगे,ज्ञानेश्वर फुले,महादेव फुले,राजेंद्र बनकर, नरूटे सर,माऊली फुले, उमेश फुले व अकलूज माळेवाडी परिसरातील माळी समाजाचे बांधव उपस्थित होते.तसेच सावतामाळी विद्यालय माळेवाडी व जिल्हा परिषद शाळा माळेवाडीतील मुले-मुली सहभागी झाले होते.या कार्यक्रमाचे आयोजन संत सावता माळी ट्रस्ट व समस्त माळेवाडी ग्रामस्थ यांनी केले होते. महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली.






कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा