Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

मंगळवार, १ सप्टेंबर, २०२६

गाजी-ए-मिल्लत सुफीसंत हाजी हाफिज फतेह मोहंमद जोधपुरी बाबा (रहे.) लुमेवाडी, (ता. इंदापूर) यांच्या ३३ वा उरुस निमित्त दि.३ ते दि.५ सप्टेंबर पर्यंत विविध कार्यक्रमाचे आयोजन

 *कार्यकारी संपादक*

*एस. बी. तांबोळी*

*टाइम्स 45 न्यूज मराठी* 

*मो:-8378081147*


----- गाजी-ए-मिल्लत सुफीसंत हाजी हाफिज फतेह मोहंमद जोधपुरी बाबा (रहे.) लुमेवाडी, (ता. इंदापूर) यांच्या ३३ वा उरुस निमित्त दि.३ ते दि.५ सप्टेंबर पर्यंत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त सैफ आसिफ साबरी खान ब्रदर्स (मुंबई) व रफीक आफताब साबरी (उत्तर प्रदेश) यांच्यात "कव्वाली" चा शानदार मुकाबला होणार आहे. तसेच उरूस निमित्त महाप्रसादाचे आयोजनही करण्यात आले आहे



      हाजी हाफिज फतेह मोहम्मद जोधपूरी (बाबा) यांच्या ३३ वा उरूसनिमीत्त गुरूवार दि.३ रोजी मजारवर (समाधी) संदल चढवण्यात येणार आहे. तर शुक्रवार दि.४ रोजी मुख्य उरुस निमित्त राज्यासह राजस्थान, कर्नाटक व आंध्र प्रदेश येथील भाविक दर्शनासाठी उपस्थिती राहतात. यानिमित्त मोठी यात्रा भरते त्यामध्ये मेवा मिठाई, खेळणी, सौंदर्य प्रसाधने आदिंची दुकाने थाटण्यात येतात. तसेच सायंकाळी सात वाजता सैफ आसिफ साबरी खान ब्रदर्स (मुंबई) व रफीक आफताब साबरी (उत्तर प्रदेश) यांच्यात "कव्वाली" चा शानदार मुकाबला होणार आहे. तर शनिवार दि.५ रोजी सकाळी आठ वाजता जियारत होवून ऊरूसाची सांगता करण्यात येणार आहे. उरूस निमित्त येणाऱ्या भाविकांसाठी परंपरेप्रमाणे दालचा राईसचा महाप्रसाद ठेवण्यात आला आहे.


     हजरत सूफी वली चाँद पाशा (आवाटी), हजरत शहजादा ए-सूफी-ए-हिंद हजरत सय्यद अली रजा अमीर साहब किबला (अंबेजोगाई), हजरत यादअली साहब (छोटे बाबजी राजस्थान), सज्जादा नशीन सूफी हसनैन कादरी (आवाटी शरीफ) यांच्या देखरेख व मार्गदर्शनाखाली कार्यक्रम संपन्न होणार आहे. तसेच परंपरेनुसार उरुस निमित्त अकलूज (ता.माळशिरस) येथील काझी गल्ली येथून मानाचा संदल मिरवणूकीने आणण्यात येणार आहे.

       सादीकभाई उर्फ अदीशाह दर्गा डेकोरेशन लायटिंग विजापूर तसेच पांडे साउंड सिस्टीम अकलूज यांचे दर्गाहवरती डेकोरेशनचे विशेष सहकार्य लाभणार आहे. दर्गाह ट्रस्टी सुफीसंत हाजी हाफिज फतेह मोहंमद जोधपूरी बाबा (रहे.) दर्गाह कमिटी, मुस्लीम जमात व ग्रामपंचायत लुमेवाडी व जोधपूरी बाबा यंग सर्कल यांनी उरूसचे नियोजन केले आहे.

फोटो - लुमेवाडी येथील सुफी संत हाजी हाफीज फतेह मोहंमद जोधपूरी बाबा.

---------------------------

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा