Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

मंगळवार, १ सप्टेंबर, २०२६

निलिमाताई पवार यांची 'सामाजिक कल्याण एवं मानव संरक्षण संघा'च्या अकलूज शहर महिला अध्यक्षपदी निवड

 *अकलूज-- प्रतिनिधी* 

*टाइम्स 45 न्यूज मराठी-

*मो:-9730867448*


गोरगरीब, वंचित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी आणि मानवाधिकार रक्षणासाठी सातत्याने कार्यरत असलेल्या 'सामाजिक कल्याण एवं मानव संरक्षण संघा'च्या अकलूज शहर महिला अध्यक्षपदी निलिमाताई पवार यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

​सदर निवड संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेशभाई कुंभारे (नागपूर), पश्चिम भारत अध्यक्ष अमोल बाळासाहेब माने आणि महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष किशोर थोरात यांच्या प्रमुख उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली जाहीर करण्यात आली.

​आपल्या निवडीबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना नवनिर्वाचित शहर महिला अध्यक्षा निलिमाताई पवार म्हणाल्या, "महिला जिल्हा अध्यक्षा शुभांगीताई मोरे, माळशिरस तालुका महिला अध्यक्षा अश्विनीताई पांढरे, आणि तालुका महिला उपाध्यक्षा वंदनाताई तिकुठे यांच्यासह वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली मी काम करणार आहे. संपूर्ण अकलूज शहर तसेच माळशिरस तालुक्यात महिलांना संघटित करून, त्यांच्या हक्कांचे संरक्षण करणे आणि संघटनेची ताकद वाढवणे हे माझे मुख्य ध्येय असेल."

​सध्या अकलूज शहर आणि माळशिरस तालुक्यात पश्चिम भारत अध्यक्ष अमोल बाळासाहेब माने यांच्या नेतृत्वाखाली गोरगरिबांना मदत करणे, मानवाधिकारांशी संबंधित कायद्यांची जनजागृती करणे आणि महिलांवरील अन्याय-अत्याचाराच्या विरोधात ताकदीने आवाज उठवण्याचे काम अविरत सुरू आहे. निलिमाताई पवार यांच्या निवडीमुळे अकलूज शहरातील महिला संघटनेला अधिक बळ मिळेल, असा विश्वास सर्व वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला असून, त्यांच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा