*अकलुज-- प्रतिनिधी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-9730867448*
अकलूज, (वार्ताहर):
अकलूज नगरपरिषद हद्दीतील ग्रामदैवत श्री अकलाई देवी मातेचा आगामी नवरात्रोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. या पवित्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंदिरात येणाऱ्या हजारो भाविकांची गैरसोय टळावी आणि संभाव्य अपघात टाळावेत, यासाठी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे उपाध्यक्ष जतिन वायदंडे यांनी अकलूज नगरपरिषदेचे मा.
उप मुख्याधिकारी जयसिंगराव खुळे यांना निवेदन देण्यात आले
निवेदनातील प्रमुख मागण्या:
रस्त्याची दुरुस्ती: अकलाई मंदिराकडे जाणाऱ्या पुलावर मोठे-मोठे खड्डे पडले असून, सततच्या वर्दळीमुळे वाहनचालक व पायी जाणाऱ्या भाविकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे, हे खड्डे तातडीने बुजविण्यात यावेत.
फांद्यांची छाटणी: मंदिराच्या भिंतीशेजारील झाडांच्या वाढलेल्या फांद्या थेट रस्त्यावर आल्यामुळे वाहतुकीस व नागरिकांच्या ये-जा करण्याला अडथळा निर्माण होत असल्याने त्यांची छाटणी करावी.
परिसर स्वच्छता: ओढच्या परिसरात व आजूबाजूला वाढलेली काटेरी झुडुपे व तण काढून संपूर्ण परिसर स्वच्छ करण्यात यावा.
सध्या निर्माण झालेल्या या गंभीर समस्यांमुळे भाविकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे प्रशासनाने या बाबी गांभीर्याने घेऊन नवरात्रोत्सवापूर्वी सर्व समस्या तात्काळ मार्गी लावाव्यात आणि भाविकांसाठी सुरक्षित व सुकर रस्ता उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी या निवेदनाद्वारे मुख्याधिकारी अकलूज नगरपरिषदेच्याकडे करण्यात आली आहे.
सदर निवेदन हे आरोगदूत लोकप्रिय मा. आ. रामभाऊ सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली देण्यात आले.
यावेळी उपस्थित
अमोल माने
भाजप सरचिटणीस अकलूज शहर ,
जतिन वायदंडे
भाजप युवा मोर्चा उपाध्यक्ष अकलूज शहर
दत्तात्रय खंडागळे मयूर म्हेत्रे,
शुभम सपताळे, आकाश पवार, अविनाश सावंत आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सोमवार, २८ सप्टेंबर, २०२६
Home
/
Unlabelled
/
अकलूजच्या ग्रामदैवत श्री अकलाई देवी मंदिर परिसरातील रस्ता दुरुस्ती आणि स्वच्छतेसाठी प्रशासनाला निवेदन; भाजप युवा मोर्चा आक्रमक
अकलूजच्या ग्रामदैवत श्री अकलाई देवी मंदिर परिसरातील रस्ता दुरुस्ती आणि स्वच्छतेसाठी प्रशासनाला निवेदन; भाजप युवा मोर्चा आक्रमक
Tags
About संपादक हुसेन मुलानी
Chief Editor of AJ_24_Taas
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा