Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

रविवार, २७ सप्टेंबर, २०२६

*सावित्रीबाई फुले लोकसंचालित साधन केंद्राची १७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न.* महिलांचे सक्षमीकरण,आर्थिक स्वावलंबनातून,सक्षम समाजाकडे !

*अकलूज -+प्रतिनिधी* *टाइम्स 45 न्यूज मराठी*
महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम),सोलापूर महाराष्ट्र राज्य जीवनोन्नती अभियान व तेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्योग विकास प्रकल्प अंतर्गत सावित्रीबाई फुले लोकसंचालित साधन केंद्र, यशवंतनगर यांची १७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. या कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व दिप प्रज्वलन माविमचे विभागीय संनियंत्रण व मूल्यमापन अधिकारी विलास बच्चे,सहायक जिल्हा समन्वय अधिकारी दिपक टेकाळे,तालुका उपजीविका सल्लागार उमेश जाधव,बँक ऑफ महाराष्ट्र अकलूज शाखेचे व्यवस्थापक महेश गव्हाणे, युनियन बँक ऑफ इंडिया अकलूजचे किशोर धुके यांच्या शुभहस्ते करण्यात आले. सीएमआरसी च्या अध्यक्षा जयश्री संजय एकतपुरे यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा पार पडली. कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते सीएमआरसी च्या वार्षिक अहवाल पुस्तिकेचे प्रकाशन उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन सीएमआरसी च्या व्यवस्थापक तनुजा पाटील यांनी केले.त्यांनी संस्थेच्या वर्षभरातील कामकाजाचा आढावा तसेच आगामी नियोजनाची माहिती दिली.सीएमआरसी च्या लेखापाल सविता क्षीरसागर यांनी संस्थेचा आर्थिक लेखाजोखा व ऑडिट अहवाल सादर केला.ग्रामसंघ लेखापाल रुकसाना काझी यांनी ग्रामसंघाचा अहवाल वाचन केला, तर उपजीविका सल्लागार आकाश लोंढे यांनी सब- प्रोजेक्टचा आढावा सादर केला.
विभागीय संनियंत्रण व मूल्यमापन अधिकारी विलास बच्चे यांनी महिलांनी आर्थिक व्यवहारांमध्ये स्वतः सक्रिय राहण्याचे महत्त्व स्पष्ट केले.बचत गटाच्या सभा महिलांनी स्वतः उपस्थित राहून प्रश्न मांडावेत आणि आपल्या संस्थेच्या कामकाजात सक्रिय सहभाग घ्यावा असे आवाहन त्यांनी केले. तसेच बचत गटांमार्फत उपलब्ध होणाऱ्या विविध सेवा आणि महिलांसाठी तसेच उद्योग वाढीसाठी शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली. सहायक जिल्हा समन्वय अधिकारी दिपक टेकाळे यांनी बचत गटात सहभागी होण्याचे फायदे,माविममार्फत महिलांसाठी राबविण्यात येणारे विविध उपक्रम,प्रकल्प व उपप्रकल्प याबाबत मार्गदर्शन केले.तर तालुका उपजीविका सल्लागार उमेश जाधव यांनी तालुक्यातील गटांचे कामकाज,तसेच जास्तीत जास्त महिलांनी शेतकरी महिला नोंदणी करून विविध योजनांचा लाभ घ्यावा, याबाबत मार्गदर्शन केले.बँक ऑफ महाराष्ट्र, अकलूजचे महेश गव्हाणे यांनी सावित्रीबाई फुले सीएमआरसी अंतर्गत गेल्या दोन वर्षांत त्यांच्या बँकेमार्फत सुमारे १२ कोटी रुपयांचे कर्ज वितरण झाल्याबद्दल समाधान व्यक्त केले. प्रत्येक बचत गटाने अधिकाधिक आर्थिक प्रगती साधून २० लाख रुपयांपर्यंत कर्ज घेण्याचे उद्दिष्ट ठेवावे आणि कर्जाची वेळेत परतफेड करावी असे आवाहन त्यांनी केले. *उत्कृष्ट महिला उद्योजक व उत्कृष्ट परसबाग व बचत गटांचा गौरव.* या कार्यक्रमात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिला उद्योजक,पदाधिकारी, बचत गट तसेच उत्कृष्ट परसबाग यांचा ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला.
*उत्कृष्ट परसबाग पुरस्कार* कांचन तुकाराम बनकर, शेती आधारित उद्योजक पुरस्कार - राणी मोहन शिंदे दुग्ध व्यवसाय (प्रथम क्रमांक),रुक्मिणी अर्जुन पासगे शेळीपालन (व्दितीय क्रमांक),सोनाली स्वामीनाथ निकम कुक्कुटपालन (तृतीय क्रमांक) *बिगरशेती आधारित उद्योजक पुरस्कार* शीतल नामदेव काळे शेंगदाणा लाडू (प्रथम क्रमांक), फरीदा रहिमन शेख शेंगदाणा चक्की,खोबरा चक्की (व्दितीय क्रमांक),मंगल दीपक बनकर – केटरिंग व्यवसाय (तृतीय क्रमांक) *उत्कृष्ट कार्यतत्पर पदाधिकारी पुरस्कार* जयश्री संजय एकतपुरे (अध्यक्ष),राजश्री वासुदेव जाधव (सचिव),कौसर मुल्काद्दीन शेख (कोषाध्यक्ष) *सर्वाधिक कर्ज मिळविणारा उत्कृष्ट बचत गट* बिस्मिल्ला स्वयं सहाय्यता महिला बचत गट, माळीनगर तसेच कार्यक्रमात स्टॉल लावणाऱ्या महिला उद्योजिकांनाही प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.तिरंगा थाळी, आरोग्य तपासणी व जनजागृती महिलांनी तयार करून आणलेल्या तिरंगा थाळी उपक्रमालाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.उत्कृष्ट तिरंगा थाळी सादर करणाऱ्या महिलांना क्रमांकानुसार सन्मानित करण्यात आले.यावेळी यशवंतनगर उपकेंद्राच्या वतीने महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली. परसबाग या विषयावर सीएमआरसी च्या कोषाध्यक्ष कौसर शेख यांनी सादर केलेल्या लघुनाटिकेतून महिलांना परसबागेचे महत्त्व प्रभावीपणे समजावून सांगण्यात आले. उद्योजक महिला रुक्मिणी पासगे यांनी रेकॉर्डिंगच्या माध्यमातून शेळीपालन व्यवसायातील अनुभव कथन केला तसेच मंगल बनकर यांनी केटरिंग व्यवसाय व भाजीपाला लागवडीबाबत आपले मनोगत व्यक्त केले. *महिलांच्या आत्मनिर्भरतेचा संकल्प.* या वार्षिक सभेत महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासोबतच उद्योजकता,बचत,कर्ज, उपजीविका,आरोग्य आणि शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन आत्मनिर्भर होण्याचा संदेश देण्यात आला. कार्यक्रमाच्या शेवटी सीएमआरसी च्या अध्यक्षा जयश्री एकतपुरे यांनी आभार प्रदर्शन केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सीएमआरसी लेखापाल सविता क्षीरसागर,उपजीविका सल्लागार आकाश लोंढे, सहयोगिनी रिजवाना शेख, वैशाली कांबळे,मनीषा गवळी, ग्रामसंघ लेखापाल रुकसाना काझी,सीआरपी , कार्यकारी मंडळ तसेच सर्व पदाधिकारी व महिलांचे मोलाचे सहकार्य लाभले. चौकट *शेळीपालनातून आत्मनिर्भर झालेल्या रुक्मिणी पासगे यांचा प्रेरणादायी प्रवास* श्रीमती रुक्मिणी अर्जुन पासगे वय ५५ यांनी वीरलक्ष्मी महिला बचत गट,चौंडेश्वरवाडी (उदयनगर) या बचत गटातून सन २०१६ मध्ये दहा हजार रुपयांचे पहिले कर्ज घेऊन.त्या पैशातून दोन शेळ्या खरेदी करून शेळी पालन व्यवसाला सुरुवात केला. *आजची स्थिती* - सध्या लहान-मोठ्या मिळून १७ शेळ्या व १५ बोकड आहे.शेळीपालन व्यवसाय करून मोठी उलाढाल केली असून या शेळीपालनाच्या उत्पन्नातून आतापर्यंत सुमारे ९ लाख रुपयांची उलाढाल केली आहे.हा व्यवसाय करताना कुटुंबासाठी खर्च ही केला आहे.त्यामध्ये दोन्ही मुलींच्या लग्नासाठी प्रत्येक मुलीसाठी २ लाखाचा खर्च,बाळंतपणासाठी ८२ हजाराचा खर्च,धाकट्या मुलीच्या शिक्षणासाठी दरवर्षी ३० ते ३५ हजाराचा खर्च करत आहेत.ऐवढा खर्च करूनही आज २ लाख रुपये बँकेत मुदत ठेव (FD) ठेवली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा