*अकलूज-- प्रतिनिधी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-9730867448*
अकलूज शहरातील अत्यंत वर्दळीचा परिसर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जुने एसटी स्टँड पाठीमागील पटेल बोळ परिसरातील रस्त्याची दुर्दशा झाली असून, या खराब रस्त्यामुळे येथील नागरिक, व्यावसायिक आणि वाहनचालक कमालीचे त्रस्त झाले आहेत. रस्त्यावरील खड्डे आणि साचणाऱ्या पाण्यामुळे निर्माण झालेली बिकट परिस्थिती पाहता, हा रस्ता तातडीने दुरुस्त करण्यात यावा, अशी आक्रमक मागणी भारतीय जनता पक्षाचे सरचिटणीस, अमोल माने यांनी केली आहे,
पटेल बोळ हा परिसराचा भाग व्यापाराच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. येथे दररोज शेकडो नागरिक खरेदीसाठी येतात, तसेच शाळकरी मुले आणि महिलांचीही मोठी रेलचेल असते. मात्र, सध्या या संपूर्ण रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे आणि रस्त्याची उडालेल्या चाळणीमुळे नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. अनेक दुचाकीस्वार या खड्ड्यांमध्ये घसरून अपघातांचे शिकार झाले आहेत, तरीही संबंधित प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे,
"स्थानिक नागरिकांची ही समस्या अत्यंत न्याय्य आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे सर्वसामान्यांना आणि व्यापाऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. जर लवकरात लवकर या रस्त्याची दुरुस्ती करून तो पूर्ववत करण्यात आला नाही, तर पुढील काळात तीव्र आंदोलन उभारण्यात येईल," असा स्पष्ट इशाराही भारतीय जनता पार्टी अकलूज शहराच्या वतीने देण्यात आला आहे. हे निवेदन आरोग्यदूत लोकप्रिय दमदार मा. आमदार रामभाऊ सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली देण्यात आले
यावेळी उपस्थित
विक्रम गायकवाड
अकलूज शहर उपाध्यक्ष
अमोल माने
अकलूज शहर सरचिटणीस
जतिन वायदंडे
युवा मोर्चा उपाध्यक्ष अकलूज शहर
विक्रम देशमाने
शशिकांत ननवरे
समर कोतमिरे
अभिषेक चाबुकस्वार
रोहित कुलकर्णी
गुरुवार, २४ सप्टेंबर, २०२६
Home
/
Unlabelled
/
अकलूजच्या जुने एसटी स्टँड पाठीमागील पटेल बोळ परिसरातील रस्त्याची दुरवस्था; नागरिक आणि व्यावसायिक त्रस्त - भाजप सरचिटणीस अमोल माने यांची अकलूज नगरपरिषदकडे तातडीने रस्ता करण्याची मागणी
अकलूजच्या जुने एसटी स्टँड पाठीमागील पटेल बोळ परिसरातील रस्त्याची दुरवस्था; नागरिक आणि व्यावसायिक त्रस्त - भाजप सरचिटणीस अमोल माने यांची अकलूज नगरपरिषदकडे तातडीने रस्ता करण्याची मागणी
Tags
About संपादक हुसेन मुलानी
Chief Editor of AJ_24_Taas
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा