पुणे, डॉ. संदेश शहा.
टाईम्स 45 न्यूज मराठी सहसंपादक मो. ९९२२४१९१५९
सकल जैन समाज, विमाननगर, पुणे यांच्या वतीने आयोजित भव्य अत्यंत भक्तिमय व उत्साही वातावरणात पार पडला. जैन धर्मातील क्षमा, मैत्री आणि अहिंसेचा संदेश देणाऱ्या या कार्यक्रमात समाजातील दोन दानवीर व सेवाभावी व्यक्तिमत्वांचा विशेष सन्मान करण्यात आला.
समाजातील दानवीर व्यक्तिमत्त्व *श्राविका शिरोमणि श्रीमती शोभा ताई धारीवाल* यांना यावेळी मानाचा *'भामाशाह सन्मान'* देऊन गौरविण्यात आले. शोभा ताई यांनी आजवर जैन धर्म, समाज, मंदिर, स्थानक, जीवदया, शिक्षण आणि गौशाळा, तसेच अनेक शैक्षणिक संस्थांना उदार हस्ते मदत केली आहे. त्यांच्या या अविरत दान, सेवा आणि समर्पण भावनेमुळेच त्यांना 'श्राविका शिरोमणि' ही उपाधी प्राप्त झाली आहे. आज भामाशाह सन्मानाने त्यांच्या पुण्य कार्यावर एक प्रकारे शिक्कामोर्तब झाले आहे. मान्यवरांच्या हस्ते त्यांना सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ आणि पंचरंगी दुपट्टा देऊन गौरविण्यात आले. ज्येष्ठ श्रावक शिरोमणि सुरेश जी शाह यांना *'जीवन गौरव पुरस्कार'* देऊन सन्मानित करण्यात आले. त्यांचे संपूर्ण जीवन समाजसेवा, जनकल्याण, जिन मंदिर निर्माण आणि धार्मिक कार्यासाठी समर्पित आहे. त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून हा पुरस्कार देण्यात आला. या सोहळ्याला विमाननगर, वडगावशेरी आणि पुणे परिसरातील सकल जैन समाजाचे सर्व घटक, महिला मंडळ व युवा वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. व्यासपीठावर *मिलिंद फडे, अतुल शाह, डॉ. कल्याण गंगवाल, सिद्धार्थ दोशी, सुरेंद्र गांधी, सिद्धार्थ शाह, ममता जैन, रितेश जैन, सुरेश शाह, कैलाश ठोले, डॉ. राजेश तांगडे, डॉ. श्रीकुमार बुरसे, बाबूलाल काशलीवाल, देवेंद्र जैन* यांसह सकल जैन समाजाचे पदाधिकारी, ट्रस्टी आणि ज्येष्ठ श्रावक उपस्थित होते. आयोजकांनी सांगितले की, "शोभा ताई धारीवाल आणि सुरेश जी शाह सारख्या दानवीर व्यक्तींमुळे समाजाचे अनेक धार्मिक व सामाजिक प्रकल्प पूर्णत्वास जातात. त्यांच्या पुण्य कार्याची आम्ही सर्वजण अनुमोदना करतो." समस्त जैन समाजातर्फे दोन्ही मान्यवरांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
सोमवार, २८ सप्टेंबर, २०२६
Home
/
Unlabelled
/
श्राविका शिरोमणि शोभा धारीवाल यांना 'भामाशाह सन्मान' तर सुरेश शाह यांना 'जीवन गौरव पुरस्कार'
श्राविका शिरोमणि शोभा धारीवाल यांना 'भामाशाह सन्मान' तर सुरेश शाह यांना 'जीवन गौरव पुरस्कार'
Tags
About संपादक हुसेन मुलानी
Chief Editor of AJ_24_Taas
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा