*करमाळा तालुका-- प्रतिनिधी*
*आलिम. शेख*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
उजनी धरणामध्ये होऊ घातलेल्या विविध विनाशकारी प्रकल्पाच्या विरोधासाठी चिखलठाणच्या रणरागिनी सरसावल्या असून गावातील शिवस्मारकासमोर एकत्र जमून घोषणा देत 31 तारखेच्या आंदोलनात सहभागी होण्याचा निर्धार व्यक्त केला आहे
उजनी धरणातील विनाशकारी विविध प्रकल्पांना धरणकाटावरील करमाळा इंदापूर माढा तालुक्यातील वेगवेगळ्या गावातून प्रचंड विरोध होत असून 31 तारखेला होणाऱ्या आंदोलनासाठी मोठ्या प्रमाणावर जनजागृती केली जात आहे प्रत्येक गावामध्ये बैठका घेतल्या जात असून मोठ्या प्रमाणावर लोक या आंदोलनात सहभागी होण्यासाठी जाणार आहेत यामध्ये आतापर्यंत ठराविकच महिला दिसत होत्या मात्र आज चिखलठाण नंबर दोन या गावातील कधीही घराबाहेर न पडलेल्या महिलांनी सुद्धा येथील शिवस्मारकासमोर एकत्र येऊन घोषणा देत या आंदोलनात आम्हीही सहभागी होणार असल्याचे स्पष्ट केले आहे . यामुळे या आंदोलनाची धग वाटण असून 31 तारखेच्या आंदोलनाला फार मोठा प्रतिसाद मिळत मिळणार असल्याचे चित्र दिसत आहे. उजनी धरणामध्ये होणाऱ्या प्रकल्पाच्या झळा केवळ धरणकाठीच्या शेतकऱ्यांना बसणार नाही तर सोलापूर जिल्ह्याच्या शेती व्यवसायावर याचा फार मोठा परिणाम होणार असून जिल्ह्याचे अर्थकारण यामुळे कोलमडणार असल्याने केवळ धरणकाठच्याच शेतकऱ्यांनी नव्हे तर जिल्ह्यातील इतरही सर्व शेतकऱ्यांनी आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन येथील महिला शेतकऱ्यांमधून केले जात आहे.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा