Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

सोमवार, २६ ऑक्टोबर, २०२६

*अकलूज येथे वीरशैव लिंगायत महिला गरबा-दांडिया स्पर्धा उत्साहात संपन्न* *महिलांचा उत्स्फूर्त सहभाग, विजेत्यांचा गौरव,चटपटीत खाद्यपदार्थ व कोजागिरी पौर्णिमेनिमित मसाला दुधाचा आस्वाद*

 *अकलूज प्रतिनिधी* 

 *केदार लोहकरे*

*टाइम्स 45 न्यूज मराठी*


महात्मा बसवेश्वर बहुउद्देशीय संस्था अकलूज यांच्या वतीने आयोजित केलेल्या "वीरशैव लिंगायत महिला गरबा-दांडिया स्पर्धा २०२६" पाटीदार भवन अकलूज येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाली.तेजश्री व धनश्री उंबरदंड या दोन्ही बहिणींनी गणेश वंदनेने कार्यक्रमाची सुरुवात केली.पारंपरिक वेशभूषेतील महिलांचा उत्स्फूर्त सहभाग,गरबा-दांडियाचा संगीत ताल आणि सांस्कृतिक या कार्यक्रमांमुळे संपूर्ण परिसरात महिलांमध्ये उत्सवाचे वातावरण निर्माण झाले



            या कार्यक्रमाची सुरुवात दुर्गामाता व महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले.या स्पर्धेच्या परीक्षक सौ. डॉ.शितल शेटे,सौ.नीलम पाटील तसेच महिला सदस्य सौ. लीना गुळवे,सौ.शिल्पा नष्टे,सौ. चित्रा जठार,डॉ. मनीषा बन्ने व सौ. शिल्पा गुळवे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.त्यानंतर सौ. मृणाल गुळवे,डॉ.सुचित्रा धोत्रे, सौ. रुद्राणी कोरे,सौ.मनीषा स्वामी व सौ.सोनल टोंगळे यांच्या हस्ते श्री गजलक्ष्मी पूजन करण्यात आले.यावेळी महिलांनी पारंपरिक भोंडल्याचा फेर धरून सांस्कृतिक परंपरेचे दर्शन घडविले.या स्पर्धेत लहान व मोठ्या गटांतील महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. आकर्षक सादरीकरणे,तालबद्ध नृत्य आणि उत्साहपूर्ण सहभागामुळे स्पर्धा रंगतदार झाली.


         या स्पर्धेत लहान गटात सोनिया गुळवे (प्रथम क्रमांक),  आरोही ढवळसकर (द्वितीय क्रमांक),वैष्णवी गोटे (तृतीय क्रमांक) यांनी पटकावला तर मोठ्या गटात अक्षदा गवसणे

(प्रथम क्रमांक),श्रेया गुळवे (द्वितीय क्रमांक),डॉ.मनीषा बन्ने (तृतीय क्रमांक) यांनी मिळविला.बेस्ट ड्रेसिंगचा पुरस्कार निरवी ढवळसकर यांना मिळाला. याशिवाय बेस्ट गरबा पुरस्कार प्राजक्ता जठार,बेस्ट एक्स्प्रेशन पुरस्कार वैष्णवी शेटे, बेस्ट एनर्जी पुरस्कार प्रणाली गोटे तर जनरल राउंडचा पुरस्कार सारिका गुळवे यांना प्रदान करण्यात आला.विजेत्या स्पर्धकांचा ट्रॉफी व प्रशस्तिपत्र देवून गौरविण्यात आले.या कार्यक्रमाला वीरशैव लिंगायत समाजातील महादेव मंदिराचे पुजारी स्वामी यांच्यासह गुळवे,नष्टे,शेटे,जठार,आर्वे, कथले,पाटील,कुरूडकर,नडगिरे,धोत्रे,कोरे,बन्ने,उंबरदंड,दिवटे, ढवळस्कर,कनाळ,टोंगळे, देशमुख व गोटे परिवारातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

               या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी महात्मा बसवेश्वर बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष तसेच सर्व पुरुष व महिला सदस्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी नियोजनबद्ध परिश्रम घेतले.कार्यक्रमानंतर महिलांनी चटपटीत खाद्य पदार्थांचा आस्वाद घेतला तसेच कोजागिरी पौर्णिमेनिमित्त चंद्रप्रकाशात मसाला दुधाचा आनंद घेत गप्पा-गोष्टींमध्ये महिला रममाण झाल्या.धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक एकोपा वृद्धिंगत करणारा हा सोहळा महिलांसाठी आनंददायी व अविस्मरणीय ठरला.महिला सदस्यांनी कार्यक्रमाची सांगता करत उपस्थितांचे आभार मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा