Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

मंगळवार, २७ ऑक्टोबर, २०२६

सोलापूर येथील दुष्काळ परिषदेमुळे जेऊर येथील शुक्रवारी होणारी दुष्काळ निवारण व पाणीटंचाई आढावा बैठक पुढे ढकलण्यात आली आहे*

 *करमाळा तालुका-- प्रतिनिधी* 

     *आलिम. शेख*

*टाइम्स 45 न्यूज मराठी*


करमाळा व माढा तालुक्यातील दुष्काळ निवारण व पाणी टंचाई यांचा आढावा घेण्यासाठी आमदार नारायण आबा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी ३० ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता जेऊर ता. करमाळा येथे होणारी बैठक ही पुढे ढकलण्यात आली असल्याची माहिती आमदार पाटील गटाचे प्रवक्ते सुनील तळेकर यांनी दिली आहे. याबाबत अधिक माहिती देताना तळेकर यांनी सांगितले की करमाळा मतदार संघाचे आमदार नारायण आबा पाटील यांनी दुष्काळ सदृश्य परिस्थिती व संभाव्य पाणी टंचाई उपाययोजना यासाठी विचारविनिमय करण्यासाठी व  सद्यस्थितीत असलेल्या पाणी व गुरांच्या चाऱ्याची स्थिती तसेच पिकपाणी यांचा शासकीय अहवाल जाणुन घेण्यासाठी एका आढावा बैठकीचे शुक्रवारी जेऊर येथे आयोजन केले होते. वास्तविक पाहता या बैठकीसाठीची तयारी सुरू झाली होती तसेच ग्रामसेवक तलाठी व कृषी सहायक यांनी गावोगावचे अहवाल तयार करण्यास सुरुवात केली होती. परंतू नेमके दिनांक ३० ऑक्टोबर रोजी सोलापूर येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ येथे एका दुष्काळ परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. दुष्काळ संबंधित सर्व कर्मचाऱ्यांना या दुष्काळ परिषदेसाठी उपस्थित राहण्याचे आदेश दस्तुरखुद्द जिल्हाधिकारी यांनी (पत्र जा.क्र.२०२६/मशा/कार्या-४/नैआ/जिनिक/ प्र.क्र.४/ आर आर १७३८ दि. २६/१०/२०२६) नुसार काढले असुन जिल्ह्यातील सर्वच तालुक्यातील ग्रामसेवक, तलाठी, कृषी सहायक यांना तसेच महसुलचे वरीष्ठ अधिकारी यांना या दुष्काळ परिषदेसाठी उपस्थित राहणे बंधनकारक केले आहे. जेऊर ता करमाळा येथील दुष्काळ निवारण व पाणी टंचाई बैठक आणि सोलापूर येथील दुष्काळ परिषद एकाच दिवशी म्हणजे शुक्रवार दि ३० ऑक्टोबर रोजीच येत असल्याने अखेर जेऊर येथील आढावा बैठक ही तात्पुरती पुढे ढकलण्यात आली आहे. विद्यमान आमदार नारायण आबा पाटील तसेच करमाळा व माढा तालुक्यातील तहसिलदार व गटविकास अधिकारी यांच्या समन्वयातून बैठकीसाठी पुढील तारीख निश्चित केली जाणार असल्याचे प्रवक्ते सुनील तळेकर यांनी सांगितले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा