*मुख्य संपादक*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-9730867448*
अकलूज नगरपरिषद हद्दीतील नागरिकांच्या व नगरपरिषद सर्व व्यापारी संकुलातील गाळेधारक यांचे भाडे पट्टी व घरपट्टीवरील व्याज व शास्ती (दंडात्मक आकार) पूर्णपणे रद्द करण्याबाबत. भारतीय जनता पार्टीचे शहर सरचिटणीस अमोल बाळासाहेब माने यांनी अकलूज नगर परिषद शिक्षक नगर अध्यक्ष मुख्याधिकारी यांना निवेदनाद्वारे मागणी केली आहे
उपरोक्त विषयास अनुसरून विनंती करतों की, यंदाच्या वर्षी अपुरा पाऊस आणि दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्यामुळे या भागात व संपूर्ण महाराष्ट्रात तीव्र दुष्काळ सदृश परिस्थिती ओढवली आहे. या बिकट परिस्थितीचा थेट परिणाम सर्वसामान्य नागरिक शेतकरी, मजूर आणि नगरपरिषदेच्या व्यापारी संकुल मधील असल्याले गाळेधारक व्यावसायिक यांच्या आर्थिक स्थितीवर परिणाम झाला आहे.
या गंभीर परिस्थितीची दखल घेऊन राज्य सरकारने दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर केली आहे. तसेच मा. जिल्हाधिकारी महोदय, सोलापूर यांनीही जिल्ह्यातील राष्ट्रीयकृत बँका व मायक्रो फायनान्स कंपन्याना सक्तीची कर्ज वसुली व दंड वसुली न करण्याबाबत सक्त सूचना दिल्या आहेत.
अकलूज नगरपरिषद हद्दीतील नागरिक आधीच आर्थिक संकटात सापडले असून, दैनंदिन उदरनिर्वाह करणे व खाण्यापिण्याचे वांदे होण्याच्या मार्गावर आहेत. अशा अत्यत हलाखीच्या परिस्थितीत नगरपरिषदेकडून घरपट्टी व व्यावसायिक गाळे भाडे भरताना त्यावर आकारण्यात येणारे व्याज व शास्ती (दंड) नागरिकांना आर्थिकदृष्ट्या अजिबात परवडणारी नाही. तरी आमच्या या निवेदनाची गांभीर्याने दखल घेऊन, अकलूज नगरपरिषद हद्दीतील नागरिकांच्या घरपट्टीवर व नगरपरिषद व्यापारी संकुलातील गाळेधारक यांचे आकारण्यात आलेले व आकारण्यात येणारे सर्व प्रकारचे व्याज व शास्ती (दंड) तात्काळ माफ (रद्द) करण्यात यावी, दुष्काळामुळे त्रस्त झालेल्या सर्वसामान्य नागरिकांना या माध्यमातून मोठा आर्थिक दिलासा मिळेल, असेही निवेदनात म्हटल
याप्रसंगी अमोल माने
सरचिटणीस भाजप अकलूज शहर विक्रम गायकवाड उपाध्यक्ष भाजप अकलूज शहर जतिन वायदंडे अध्यक्ष भाजप युवा मोर्चा अकलूज शहर
समर कोतमिरे शाहबाझ काझी इत्यादी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते
माहितीसाठी प्रत मा मुख्यमंत्री साहेव मा जिल्हाधिकारी साहेब
मा नगरविकास मंत्री साहेब




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा