Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

बुधवार, २८ ऑक्टोबर, २०२६

पुष्कर मुनीजींची ११७ वी जयंती उत्साहात; समाजसेवी कार्याबद्दल अशोक सालेचा यांना ‘समाजरत्न’ पुरस्कार*

 पुणे, डॉ. संदेश शहा. 

टाईम्स 45 न्यूज मराठी सहसंपादक मो. ९९२२४१९१५९



कोंढवा ( पुणे ) येथील श्री गुरू पुष्कर साधना केंद्र (पुष्कर धाम) येथे परमपूज्य विश्वसंत श्री पुष्कर मुनीजी महाराज साहेब यांची ११७ वी जन्मजयंती रविवार दि. २५ ऑक्टोबर रोजी भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली. यावेळी सुमारे दोन हजार भाविक उपस्थित होते. यावेळी राष्ट्रसंत पूज्य श्री नरेशमुनीजी महाराज, पूज्य श्री शालिभद्रमुनीजी महाराज आणि पूज्य मेघाश्रीजी महाराज आदी संतांचे सान्निध्य लाभले.


या कार्यक्रमास आयएएस अधिकारी आनंद भंडारी,  पासमल लुंकड, आनंद दरबारचे अध्यक्ष बाळासाहेब धोका, पुष्कर धामचे भवरीलाल जीरावाला आणि प्रकाश लुंकड प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. 

उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुष्कर धामचे अध्यक्ष व कोंढवा परिसरातील समाजसेवक अशोक सालेचा यांना उल्लेखनीय सामाजिक कार्याबद्दल ‘समाजरत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. अहिल्यानगर चे आयएएस अधिकारी आनंद भंडारी यांनी शुभेच्छा देत राज्यातील पाणी समस्या, दुष्काळ परिस्थितीमध्ये जैन समाजाने पुढे येऊन गरजू शेतकऱ्यांना मदत करावी असे आवाहन केले. 

पुणे सकल संघाचे वरिष्ठ उपाध्यक्ष बाळासाहेब धोका यांनी आपल्या भाषणात अशोक सालेचा यांच्या कार्य कौतुकाचा गुणगौरव केला.  साधुसंतांची उल्लेखनीय सेवा, जैन समाज एकत्र जोडण्यासाठी श्री संघाच्या माध्यमातून केलेले कार्य,  गो सेवा व भगवान महावीर जयंती, श्री गुरू पुष्कर साधना केंद्र स्थापनेत अशोक सालेचा यांचे महत्त्वपूर्ण योगदान असल्याचे मत बाळासाहेब धोका यांनी व्यक्त केले. प्रसन्न मूर्ती मनमिळाऊ स्वभाव असे अनेक गुण त्यांच्या व्यक्तिमत्त्वात असल्याने त्यांना 'समाजरत्न पुरस्कार २०२६' देण्याचे भाग्य आम्हाला प्राप्त झाले असे प्रतिपादन धोका यांनी केले. 

कार्यक्रमाला विजयकांत कोठारी, बादरमल बुरट,  खीमराज भंडारी आणि  नेमीचंद चोपडा, रतनलाल जीरावाला, शेवंतीलाल लुंकड आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रम यशस्वितेसाठी  राजेंद्र भन्साळी, संदीप बलदोटा, वैभव धोका,  चंपालाल नहार, चेतन चोरडिया, राजेश पारख,  भाविक दोशी, सौ. जया बलदोटा, सौ. राणी मुनोत आणि सौ. वंदना सुराणा यांच्यासह पुष्कर धाम समितीचे अध्यक्ष व सर्व विश्वस्तांनी अनमोल प्रयत्न केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा