इंदापूर, डॉ. संदेश शहा.
टाईम्स 45 न्यूज मराठी सहसंपादक मो. ९९२२४१९१५९
विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानासोबतच व्यावहारिक ज्ञान मिळावे, त्यांना अर्थव्यवस्थापनाची माहिती व्हावी तसेच त्यांच्यामध्ये आर्थिक साक्षरतेची जाणीव निर्माण व्हावी, या उद्देशाने शहा ग्लोबल स्कूल, इंदापूर येथील विद्यार्थ्यांनी शहरातील मुख्य बाजार पेठेतील जनता सहकारी बँकेला शैक्षणिक भेट दिली.
या भेटीदरम्यान बँकेचे व्यवस्थापक सुजित फडकुले यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांना बँकेच्या कामकाजाची सविस्तर माहिती देण्यात आली. बँकेचे अधिकारी विवेक देगावकर यांनी विद्यार्थ्यांना बँकेतील विविध व्यवहार, बचत खाते, ठेवी, पैसे काढण्याची प्रक्रिया, बँक लॉकरची सुविधा तसेच मौल्यवान वस्तूंच्या सुरक्षिततेसाठी बँकेत राबविण्यात येणाऱ्या उपाययोजनांची सविस्तर माहिती दिली. बँकेचे दैनंदिन कामकाज, आर्थिक व्यवहारांमधील शिस्त आणि बचतीचे महत्त्व याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी उत्सुकतेने प्रश्न विचारून बँकिंग व्यवस्थेची माहिती जाणून घेतली.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवातून बँकेच्या कार्यपद्धतीची ओळख झाली तसेच आर्थिक नियोजन, पैशांची बचत आणि आर्थिक जबाबदारी यांचे महत्त्व समजण्यास मदत झाली.
शहा ग्लोबल स्कूलच्या वतीने सुजित फडकुले, विवेक देगावकर आणि जनता सहकारी बँकेच्या सर्व कर्मचाऱ्यांचे सहकार्य व मार्गदर्शनाबद्दल आभार व्यक्त करण्यात आले.
विद्यार्थ्यांमध्ये जिज्ञासा, आत्मविश्वास आणि जीवनोपयोगी कौशल्ये विकसित करण्यासाठी शहा ग्लोबल स्कूलतर्फे अशा अनुभवाधारित शैक्षणिक उपक्रमांचे सातत्याने आयोजन करण्यात येत असल्याची माहिती शाळेचे विश्वस्त अंगद शहा यांनी दिली.
शनिवार, ३ ऑक्टोबर, २०२६
Home
/
Unlabelled
/
अर्थव्यवस्थापनाची माहिती होण्यासाठी शहा ग्लोबल स्कूलच्या विद्यार्थ्यांची जनता सहकारी बँकेला शैक्षणिक भेट.
अर्थव्यवस्थापनाची माहिती होण्यासाठी शहा ग्लोबल स्कूलच्या विद्यार्थ्यांची जनता सहकारी बँकेला शैक्षणिक भेट.
Tags
About संपादक हुसेन मुलानी
Chief Editor of AJ_24_Taas
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा