*सोलापूर- प्रतिनिधी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
सोलापूर : सोलापूर शहरातील इंडिया टी सात रस्ता परिसरातील सदर बाजार येथील म्युनिसिपल कॉलनीमध्ये एका २१ वर्षीय तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. चंद्रकुमार शिवा गोडसुले असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, चंद्रकुमार याचे शहरातील एका तरुणीसोबत प्रेमसंबंध होते. काही दिवसांपूर्वीच दोघांचा साखरपुडा झाल्याची माहिती समोर येत आहे. मात्र, साखरपुड्यानंतर मुलीच्या आईकडून लग्नासंदर्भात टाळाटाळ होत असल्याने चंद्रकुमार मानसिक तणावात होता, अशी माहिती नातेवाइकांनी दिली आहे.याच प्रेमप्रकरणातून आलेल्या नैराश्यातून त्याने टोकाचे पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. आत्महत्येपूर्वी त्याने सोशल मीडियावर स्टेटस ठेवल्याचीही माहिती समोर आली आहे.
या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, तरुणाच्या मृत्यूमागील नेमके कारण काय, याबाबत विविध चर्चा सुरू आहेत. दरम्यान, या प्रकरणाचा अधिक तपास झाल्यानंतरच आत्महत्येमागील नेमके कारण स्पष्ट होणार आहे.
सोलापूर शहरातील या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून, पुढील तपासात काय माहिती समोर येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
बुधवार, ३० सप्टेंबर, २०२६
ब्रेकिंग न्यूज | सोलापुरात प्रेमप्रकरणातून तरुणाचे स्टेटस ठेवून गळफास!
Tags
About संपादक हुसेन मुलानी
Chief Editor of AJ_24_Taas
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा