Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

गुरुवार, १ ऑक्टोबर, २०२६

आवाटी येथे वली बाबा दर्गा मध्ये जश्ने-गोसे आजम चा धार्मिक कार्यक्रम उत्साहात संपन्न

*करमाळा तालुका-- प्रतिनिधी* *आलिम. शेख* *टाइम्स 45 न्यूज मराठी*
सोलापूर तसेच धाराशिव जिल्ह्याच्या सीमेवर वसलेल्या करमाळा तालुक्यातील आवाटी येथील हजरत वली चांद पाशा दर्गा मध्ये आज जशने गौसे आजम चा धार्मिक कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला असल्याची माहिती वली बाबा दर्गा ट्रस्टचे अध्यक्ष तसेच माजी नगराध्यक्ष हाजी कादरभाई तांबोळी यांनी बोलताना दिली
आज सकाळी नऊ वाजता वली बाबा दर्गा मध्ये फातीहा खाणीचा कार्यक्रम झाला याशिवाय जशने गौसे आजम कार्यक्रमाच्या निमित्ताने आज आलेल्या भक्तगणांना मुए मुबारक दर्शन तसेच लंगर खाना याशिवाय मुरीद अर्थात शिष्य बनणे असा विविध धार्मिक कार्यक्रम चे आयोजन करण्यात आले होते सदरच्या कार्यक्रमाला राज्यातून तसेच परराज्यातून अनेक हजारो भक्तगण यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा