*करमाळा तालुका-- प्रतिनिधी*
*आलिम. शेख*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
करमाळा तालुक्यातील मांगी या मध्यम प्रकल्पातील पाणी पिण्यासाठी राखुन ठेवायचे या कारणास्तव जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांनी महावितरणला या भागातील वीज पुरवठा हा दोन तास करण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशाची अंमलबजावणी झाल्याने मांगी आणि परिसरातील पिके धोक्यात आल्याने आमदार नारायण आबा पाटील हे जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन त्यांचे समोर वस्तुस्थिती मांडणार असल्याची माहिती आदिनाथचे संचालक देवानंद बागल यांनी दिली आहे. याबाबत अधिक माहिती देताना देवानंद बागल यांनी सांगितले की अलनिनोच्या पार्श्वभूमीवर संभाव्य पाणी टंचाई टाळण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी सोलापूर जिल्ह्यातील मध्यम प्रकल्पातील पाणी साठा नागरिकांच्या पिण्याच्या पाण्यासाठी राखुन ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या वर उपाययोजना म्हणुन तातडीने मध्यम प्रकल्प परिसरातील वीज ही आठ तासावरुन थेट दोन तासावर कपात करण्यात आली आहे. यामुळे मांगी तलाव परिसरातील कोट्यावधी रुपयांची उभी पिके जळून चालली आहेत. शेतकरी हा आणखी आर्थिक संकटात सापडला जाणार आहे. मांगी प्रकल्प परिसरातील सर्वच नऊ ते दहा गावातील कुपनलिका व विहीर यातील पाणी उपसणे सुध्दा बंद झाल्याने पिकां सह जनावरांचा चारा पाणी यावरही परिणाम झाला आहे. दुग्ध व्यवसाय सुध्दा धोक्यात आला आहे. यामुळे आमदार नारायण आबा पाटील हे लवकरच जिल्हाधिकारी श्री कार्तिकेयन यांची भेट घेऊन त्यांचेसमोर शेतकऱ्याची व्यथा मांडणार आहेत व या निर्णयामुळे हौत असलेल्या अडचणी दुर करण्यासाठी काही उपाय योजना करता येतील यावर चर्चा करणार असल्याचेही संचालक देवानंद बागल यांनी सांगितले.
गुरुवार, १ ऑक्टोबर, २०२६
Home
/
Unlabelled
/
*मांगी आणि परिसरातील वीज कपात प्रश्नी आमदार नारायण आबा पाटील हे जिल्हाधिकारी यांची भेट घेणार, देवानंद बागल यांची माहिती
*मांगी आणि परिसरातील वीज कपात प्रश्नी आमदार नारायण आबा पाटील हे जिल्हाधिकारी यांची भेट घेणार, देवानंद बागल यांची माहिती
Tags
About संपादक हुसेन मुलानी
Chief Editor of AJ_24_Taas
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा