*करमाळा तालुका-- प्रतिनिधी*
*आलिम. शेख*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
दहिगाव उपसा जलसिंचन योजनेतून तातडीने पाण्याचे आवर्तन सोडण्यात यावे अशा मागणीचे निवेदन आज मुंबई येथे राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे आमदार नारायण आबा पाटील यांनी केली आहे
आमदार नारायण आबा पाटील यांची जलसंपदा मंत्री विखे-पाटील यांच्यासोबत मुंबई सह्याद्री येथे नुकतीच बैठक. संपन्न झाली त्यावेळी आमदार पाटील यांनी सदरची मागणी केली
अल निनोचा संभाव्य प्रभाव आणि करमाळा तालुक्यातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता दहिगाव उपसा सिंचन योजनेतून तातडीने पाणी आवर्तन सोडण्यात यावे,या मागणीसाठी आमदार नारायण(आबा) गोविंदराव पाटील यांनी आज मुंबई येथील सह्याद्री अतिथिगृह येथे राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांची भेट घेऊन चर्चा केली.
करमाळा तालुक्यातील अनियमित पाऊस, खरीप पिकांचे झालेले नुकसान, रब्बी हंगामातील पाण्याची अनिश्चितता तसेच संभाव्य पाणीटंचाई याबाबत आमदार पाटील यांनी मंत्र्यांचे लक्ष वेधले. दहिगाव उपसा सिंचन योजनेच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून देण्याबरोबरच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न लक्षात घेऊन तातडीने पाणी आवर्तन सोडण्याबाबत संबंधित विभागाला आवश्यक निर्देश द्यावेत,अशी मागणी त्यांनी यावेळी केली. करमाळा तालुक्यामध्ये ऐन दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर आमदार पाटील यांनी दहिगाव उपसा जलसिंचन योजनेचे पाणी सोडण्याची मागणी केल्याने शेतकरी वर्गामध्ये एक प्रकारे दिलासा मिळणार आहे






कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा