Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

सोमवार, २३ नोव्हेंबर, २०२६

*सोलापूर येथील मार्केट यार्ड चौकात कंटेनर पलटी; चालक आणि क्लिनर जखमी!*

 *सोलापूर- प्रतिनिधी*

*टाइम्स 45 न्यूज मराठी*


सोलापूर : हैदराबाद येथून मुंबईच्या दिशेने निघालेला कंटेनर सोलापुरातील मार्केट यार्ड चौकात पलटी झाल्याची घटना आज, रविवार (२२ नोव्हेंबर) रोजी दुपारच्या सुमारास घडली. या अपघातात कंटेनरचा चालक हा किरकोळ तर क्लिनर हा गंभीर जखमी झाला असून, जखमी क्लिनरला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, हैदराबादहून मुंबईच्या दिशेने जाणारा हा कंटेनर मार्केट यार्ड चौकात आला होता. यावेळी चौकातून पुणे रोडच्या दिशेने वळण घेत असताना कंटेनरचे मागील चाक दुभाजकावर चढले. त्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटून कंटेनर थेट मार्केट यार्ड चौकातील बसस्टॉपसमोर पलटी झाला.


विशेष म्हणजे, या बसस्टॉपवर नेहमीच प्रवाशांची मोठी गर्दी असते. मात्र, अपघात दुपारच्या वेळी घडल्याने त्यावेळी बसस्टॉपवर प्रवासी उपस्थित नव्हते. त्यामुळे कंटेनर थेट बसस्टॉपसमोर पलटी होऊनही मोठी जीवितहानी टळली. या घटनेमुळे परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.

घटनेनंतर वाहतूक शाखेचे कर्मचारी व अधिकारी दाखल झाले असेल वाहतूक सुरळीत करण्याचे काम सुरू आहे. 

त्यांच्या साह्याने कंटेनर उचलण्याचा प्रयत्न देखील सुरू आहे

1 टिप्पणी: