Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शुक्रवार, २० नोव्हेंबर, २०२६

*जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकी करिता मोहिते पाटील गटाच्या स्वाभिमानी सहकारी पॅनलच्या प्रचारास करमाळा येथून प्रारंभ*

 *करमाळा तालुका-- प्रतिनिधी* 

     *आलिम. शेख*

*टाइम्स 45 न्यूज मराठी*


 सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर करमाळा येथील श्री कमलाभवानी देवीच्या मंदिरात दर्शन घेऊन स्वाभिमानी शेतकरी सहकार पॅनलच्या प्रचाराचा शुभारंभ आमदार रणजीतसिंह मोहिते पाटील व खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला.



प्रसंगी माजी आमदार रणजितसिंह मोहिते पाटील व खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी उमेदवार डॉ.अनिकेत देशमुख, संग्रामसिंह जहागीरदार , शिवाजी पाटील, सिंधू सुरेश पाटील  , अस्मिता गायकवाड , ॲड. दत्तात्रय खडतरे यांचेसह श्री कमलाभवानी मातेच्या चरणी नतमस्तक होऊन सहकार क्षेत्राच्या माध्यमातून शेतकरी, सभासद आणि सर्वसामान्यांच्या हितासाठी कार्य करण्याचा संकल्प व्यक्त केला.


या निवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी सहकार पॅनलच्या सर्व उमेदवारांना ‘शिट्टी’ या चिन्हावर मतदान करून विजयी करावे, असे आवाहन माजी आमदार रणजीतसिंह मोहिते पाटील, खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी केले.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव देशमुख, माजी जिल्हा परिषद सदस्य सौ सवितादेवी राजेभोसले, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे, शहाजीराव देशमुख, डॉ.वसंतराव पुंडे, उदयसिंह मोरे पाटील, महेंद्र पाटील, देवानंद बागल, ॲड.बाळासाहेब पाटील, ॲड.लुणावत, ॲड.सविता शिंदे, प्रवीण कटारिया, दशरथ कांबळे, संतोष खाटमोडे पाटील, अमरजित साळुंके, डॉ.अमोल घाडगे, संतोष वारे, दत्तात्रय देशमुख, अभयसिंह राजेभोसले, आबासाहेब टापरे, डॉ.अमोल दुरुंदे, निलेश झोळ, ॲड.प्रशांत बागल, ज्ञानेश्वर लोकरे, महेश पाटील, ज्ञानेश्वर पवार, गणेश कांबळे, शिवाजी जाधव, मुस्तकीम पठाण, ऋषिकेश सिकची यांचेसह करमाळा तालुक्यातील मान्यवर पदाधिकारी, प्रमुख कार्यकर्ते व मतदार बहुसंख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा