Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

मंगळवार, २४ नोव्हेंबर, २०२६

*तमसिन शेख हिचे पुणे येथे संपन्न झालेल्या आंतरराष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत द्वितीय क्रमांक प्राप्त करून एशियन तायक्वांदो स्पर्धेसाठी निवड*

 *मुख्यसंपादक*

*टाइम्स 45 न्यूज मराठी* 

*मो:-9730867448*



पुणे बालेवाडी स्टेडियम येथे वर्ल्ड तायक्वांडो च्यावतीने घेण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत सोलापूर जिल्ह्यातील एशियन तायक्वांदो स्पर्धेसाठी पात्रता प्राप्त करणारी एकमेव खेळाडू ‌तमसीन शेख हिने दैदिप्यमान कामगिरी करत  द्वितीय क्रमांक मिळवून एशियन तायक्वांदो स्पर्धेसाठी निवड झालीत्याबद्दल सर्वत्र तिच्या वर कौतुकाचा वर्षाव होत आहे श


माळशिरस तालुक्यातील ग्रामीण भागातील वाजीद सर आणि त्यांची मुलगी तमसिन यांचे अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून आंतरराष्ट्रीय तालुका आंतरराष्ट्रीय भागातून आपली खेळातील आवड जपत गावात कोणाला माहित नसणा-या तायक्वांदो सारख्या आॕलंपिक खेळाचे माहिती करुन दिली. सुरुवातीला कराटेचे क्लासेस घेतले त्यातसुध्दा कित्येक खेळाडूंना कराटे चॕंम्पियन बनवले. नंतर तायक्वांदोचे क्लास सुरु केले.


 सुरुवातीस अडचणी आल्या अॕडमिशन मिळत नव्हते. मग कुटुंबातील आपल्या मुलींना तायक्वांदोचे प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली. त्यांचे स्वप्न होते की आपल्या एक तरी मुलीने नॕशनल खेळावे. ज्याप्रमाणे महावीर सिंह फोगट यांनी आपल्या स्वप्नपुर्तीसाठी आपल्या लेकी गिता-बबीता या दोघींना  कुस्तीसाठी प्रोत्साहीत करुन. प्रशिक्षित केले आणि आपले  स्वप्न पूर्ण  केले. अगदी त्याचप्रमाणे  वाजिद सर मनाशी दृढ निश्चय करून आपली कष्टाळू मुलगी तमसिन शेख हिला याचे महत्त्व सांगून प्रोत्साहित केले आणि तहसील ने जिद्द मेहनत करून अफाट कष्ट घेऊन भारताचा तिरंगा फडकवत इंटरनॕशनल तायक्वांदो स्पर्धेत रोप्य पदक मिळवत आपल्या वडिलांचे स्वप्न जिद्दीने पुर्ण केले.                                                  


 सोलापूर जिल्ह्यासहीत पिलीवसारख्या छोट्या गावाचा नाव तमसिन ने मोठे केले आहे. त्याबद्दल तिचे करावे तितके कौतुक कमीच असून तिच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे या यशामध्ये तिची आई करिष्मा त्यांचे कुटुंबीय दोन्ही चुलते, चुलत बंधू यांचा सिंहाचा वाटा आहे. नेहमीच त्यांनी तमसिनला प्रोत्साहीत केले. आज आम्हांला तमसिनचा अभिमान वाटत आहे. तिची एशियन तायक्वांदो स्पर्धेकरीता निवड झाली आहे. तमसिन तुझ्या उज्वल भविष्यासाठी आणि पुढच्या स्पर्धेसाठी" "*टाइम्स 45 न्यूज चॅनल च्या लाख मोलाच्या हार्दिक शुभेच्छा !*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा